शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना : नोंदणी अर्ज भरण्यास शिक्षकांना तांत्रिक अडचणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 15:48 IST

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत नोंदणी क्रमांक मिळण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

वाशिम : जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत नोंदणी क्रमांक मिळण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या योजनेंतर्गतच्या कार्यपद्धतीच्या अंमलबजावणीच्या तारखांमध्ये फेरबदल करण्यात आले. ३० नोव्हेंबरऐवजी आता ३१ जानेवारी आणि १ डिसेंबर ऐवजी आता १ फेब्रुवारी असे बदल करण्यात आले.१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाºया जिल्हा परिषदेच्या १०० टक्के अनुदानित पदावरील शिक्षकांना व मान्यता प्राप्त खासगी १०० टक्के अनुदानित पदावरील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू आहे. या कर्मचाºयांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (डीसीपीएस) ही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १३ डिसेंबरच्या निर्णयाद्वारे केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (एनपीएस) समाविष्ठ करण्यात आली आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्याबाबतची कार्यपद्धती शिक्षण विभागाने १३ डिसेंबर रोजी निश्चित केली आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेखाली नोंदणी क्रमांक मिळण्यास विलंब होणे, कर्मचाºयांचे विहित नमुन्यातील अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे तसेच शालार्थ प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने या योजनेच्या कार्यपद्धतीच्या अंमलबजावणीच्या तारखांमध्ये बदल करण्यात येत आहे. या पद्धतीत ज्या ठिकाणी ३० नोव्हेंबर २०१९ नमूद करण्यात आलेले आहे तेथे त्याऐवजी ३१ जानेवारी २०२० व ज्या ठिकणी १ जानेवारी २०१९ नमूद करण्यात आलेले आहे, तेथे १ फेब्रुवारी २०२० असा बदल करण्यातआला आहे. या बदलानुसार आता नोंदणीची पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.शासन निर्णयानुसार वाशिम जिल्हयात या योजनेंतर्गतची कार्यवाही केली जाईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक