लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रिय हरीतसेना एस.एम.सी.इंग्लिश स्कूल वाशीमच्यावतीने १४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिन म्हणुन साजरा करण्यात आला. शाळेचे संस्थाध्यक्ष प्रा. हरीभाऊ क्षीरसागर व प्राचार्य मीना उबगडे यांच्या सहकायार्तुन दहा लाख रुपये किंमतीचा ३२ सोलार पँनलचा भव्य सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात आला . याची विजनिर्मीती क्षमता दहा किलो वँट ईतकी असुन यामधून रोज ३५ ते ४० युनीट विजनिर्मीती होते. पूर्वी संस्थेला दर महिण्याला १८ ते २० हजार रुपये बिल यायचे . पण या प्रकल्पामुळे पैशाच्या बचती सोबतच पर्यावरण संतुलन राखण्यास मद्दत झाली आहे .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मीना उबगडे होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणुन शाळेच्या पर्यवेक्षिका प्रणीता हरसुले होत्या. हरसुले यांनी विद्यार्थींना उर्जा संवर्धनाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले . तसेच सध्याच्या दैनंदिन जीवनात विजेच्या अती वापरामुळे निर्माण होणारा तुटवडा व त्यातून होणारे विजेचे भारनियमन या सर्व बाबी वर मात करायची असल्यास सौर उर्जावर चालणाºया दिव्यांचा , सौर चुलीचा व सौर उपकरणांचा वापर करावा, कारण भविष्यामध्ये इंधनाचा तुटवडा व विजेचे संकट दिवसेंदिवस वाढणार आहे . त्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे सौर उर्जा . जी केव्हाही न संपणारी नाही, म्हणुन उर्जा संवर्धनासाठी सौर उजीर्चा वापर करण्याचे आवाहन व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले . कार्यक्रमाचे आयोजन व संचलन राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले .कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिनानिमित्य सौर उर्जबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 15:10 IST