शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

नापिकी, कर्जाच्या धास्तीने शेतकर्‍याचा शेतातच मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 1:16 AM

वाशिम :  येथून जवळच असलेल्या पार्डी टकमोर  येथील  चंद्रकुमार केशरचंद टिकाईत या ५७ वर्षीय शेतकर्‍याचा नापिकी  व कर्जाच्या धास्तीने सोमवारी सायंकाळी शेतातच मृत्यू  झाल्याची  घटना समोर आली.

ठळक मुद्देपार्डी टकमोर येथील घटना 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  येथून जवळच असलेल्या पार्डी टकमोर  येथील  चंद्रकुमार केशरचंद टिकाईत या ५७ वर्षीय शेतकर्‍याचा नापिकी  व कर्जाच्या धास्तीने सोमवारी सायंकाळी शेतातच मृत्यू  झाल्याची  घटना समोर आली. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे  कर्ज तसेच मुलीच्या लग्नासाठी नातेवाइकांकडून घेतलेली  उसनवारी आणि यावर्षीची नापिकी या चिंतेतून चंद्रकुमार यांच्या  छातीत तीव्र वेदना झाल्या आणि पत्नीसमोरच त्यांनी प्राण  सोडला.पार्डी टकमोर येथील चंद्रकुमार टिकाईत यांच्याकडे तीन एकर  शेती असून, यावर्षी या शेतात सोयाबीन व तूर पेरले आहे.  सोमवारी पत्नी साधना यांच्यासोबत ते शेतात गेले होते. दिवसभर  शेतात काम केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास शेतातच त्यांच्या  छातीमध्ये तीव्र वेदना सुरू झाल्या. काही कळायच्या आतच  त्यांनी पत्नीसमोर प्राण सोडला. सोमवारी दुपारच्या सुमारास  त्यांनी शेतातील नापिकी पाहून पत्नीकडे चिंता व्यक्त केली होती.  विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे कर्ज तसेच मागील वर्षी लहान  मुलीच्या लग्नात नातेवाइकांकडून घेतलेली उसनवारीची रक्कम  कशी फेडावी, तीन ते चार लाख रुपयांच्या रकमेची व्यवस्था  कुठून करावी, याबाबत त्यांनी पत्नीशी चर्चा केली होती.  सायंकाळच्या सुमारास चंद्रकुमार यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू  झाल्या. यातच त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती मृतकाचे  मावसभाऊ अरुण गोरे रा. तोरणाळा यांनी मंगळवारी ‘लोकम त’ला दिली. चंद्रकुमार टिकाईत यांच्या पश्‍चात वडील, पत्नी,  दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाचे  शेतात अचानक मृत्यू झाल्याच्या घटनेने पार्डी टकमोर गावात  हळहळ व्यक्त होत आहे.