शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसी येथून आलेल्या नांदेडच्या  ५० भाविकांना  कनेरगाव 'चेक पोस्ट'वर रोखले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 17:13 IST

वाशिमचे तहसीलदार विजय साळवे यांनी त्यांची वाशिम येथील वस्तीगृहात व्यवस्था केली आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम :  नांदेड जिल्हयातील ५० भाविक देवदर्शनासाठी काशी, वाराणसी येथे गेले असता ‘लॉक डाऊन’ मुळे तेथे अडकले. तेथील जिल्हाधिकारी यांच्याशी या भाविकांनी संपर्क करुन काही सूचनांचे पालन करण्याच्या सुचनेवरुन त्यांची नांदेड येथे परतण्याची व्यवस्था करण्यात आली. परंतु वाशिम मार्गे नांदेड येथे जात असताना कनेरगाव पोलीसांनी त्यांना चेकपोस्टवर रोखून ठेवले. वाशिमचे तहसीलदार विजय साळवे यांनी त्यांची वाशिम येथील वस्तीगृहात व्यवस्था केली आहे.  नांदेड येथील ५० भाविक जगदगुरु विश्वाराध्य सिंहासन , जंगमवाडी मठ वाराणसी तसेच काशी यात्रेसाठी गेले होते. दरम्यान कोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर २२ मार्चपासून लॉक डाऊनमुळे हे भाविक तेथे अडकलेत.  भाविकांनी वाराणसी येथील मठाचे व्यवस्थापकांचे पत्र घेऊन वाराणसी येथील जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करुन नांदेड येथे जाण्यासाठी पत्र घेतले. यावेळी सर्व भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांच्यासोबत उत्तरप्रदेश पोलीस दलात असलेले दोन कर्मचारी सुध्दा देण्यात आलेत. वाराणसी  जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार ते वाशिम जिल्हयाची सिमापार करुन हिंगोली जिल्हयातील (वाशिम नजिक) कनेरगावजवळ त्यांना १४ एप्रिल रोजी अडविण्यात आले.  तसेच पुढे जाण्यास नकार दिल्याने भाविक वाशिम जिल्हयाच्या सिमेवर बसलेले असल्याची माहिती तहसीलदार विजय साळवे यांना १५ एप्रिल रोजी मिळाली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व भाविकांना वाशिम येथील मागासवर्गिय मुलींचे वस्तीगृह येथे ठेवण्यात आले आहे.  भाविकांसोबत असलेले उत्तरप्रदेशचे दोन पोलीस कर्मचारी व तहसीलदार साळवे हे जिल्हाधिकारी यांच्याशी या विषयावर चर्चा करुन पुढील निर्णय घेणार आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये पुढील प्रकीया पार पाडल्या जाणार असल्याची माहिती तहसीलदार विजय साळवे यांनी दिली

टॅग्स :washimवाशिमNandedनांदेडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस