शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची परस्पर वसुली; अधिकारी अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 12:39 IST

काही कर्मचारी अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून परस्पर वसुली करीत असल्याचे १५ जुलै रोजी वाशिम - मंगरुळपीर रस्त्यावर दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेसी यांनी दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिल्याने जिल्हा व शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी मोठया प्रमाणात कारवाई करीत आहेत. याचाच गैरफायदा घेत काही कर्मचारी अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून परस्पर वसुली करीत असल्याचे १५ जुलै रोजी वाशिम - मंगरुळपीर रस्त्यावर दिसून आले. एक किलोमिटर अंतरावरील एकाच मार्गावरील तीन ठिकाणी पोलीस कर्मचारी दिसून आल्याने सदर प्रकार उघडकीस आला.कोरोनाच्या पृष्ठभूमिवर जिल्हयात विना परवाना वाहने दाखल होवू नये याकरिता वाहनांची तपासणी, तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये नियमानुसार प्रवासी संख्या आहे किंवा नाही यासह वाहनांची कागदपत्रे तपासणी मोहीम संपूर्ण जिल्हयात सुरु आहे. वाशिम शहरातील मंगरुळपीर रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल ते जागमाथा या १ कि.मी. अंतरावर बुधवारी तीन ठिकाणी चार वाहतूक शाखेचे कर्मचारी आढळून आलेत. शेलुबाजारकडे जाणाºया रस्त्यावर असलेल्या चेक पोस्टनजिक असलेल्या दोन कर्मचाºयांना विचारणा केली असता त्यांनी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी असल्याचे सांगितले. तर थोडया अंतरावर असलेल्या कर्मचाºयाने सुध्दा शहर वाहतूक शाखेचा कर्मचारी असल्याचे सांगितले. मागे उभे असलेले कर्मचारीही शहर वाहतूक शाखेचेच असल्याचे सांगत आहेत असे म्हटल्यावर त्याने नाही ते जिल्हा वाहतूक शाखेचे असतील असे सांगून तेथून निघून गेला. तर जागमाथा येथे असलेला कर्मचारी काहीच न बोलता निघून गेला. अधिकाºयांशी चर्चा केली असता पेट्रोलिंगवर कर्मचारी फिरतात परंतु एकाच मार्गावर नाही. त्यावरुन पेट्रोलींगवर असलेले कर्मचारी वगळता ईतर दोन कर्मचारी अधिकाºयांना न सांगताच परस्पर वसुली करीत होते असे दिसून येते.शहरातील विविध भागात पेट्रोलिंगसाठी वेगवेगळया भागात कर्मचाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. एकाच मार्गावर तीन ठिकाणी वाहतूक कर्मचारी असतील तर त्यामध्ये जिल्हा वाहतूक शाखेचे असू शकतात. शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी एकाच मार्गावर असतील तर याची चौकशी करण्यात येईल.- राजू वाटाणे,शहर वाहतूक शाखा, वाशिमवाहतूक नियमांचे कडक पालन करण्याच्या सूचना अधिकारी, कर्मचारी यांना दिल्या आहेत. एकाच रस्त्यावर तीन ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी राहू शकत नाहीत. तरी तसे घडले असेल तर याची चौकशी करण्याच्या सूचना जिल्हा व शहर वाहतूक शाखेला देण्यात येतील.- वसंत परदेसी,पोलीस अधीक्षक , वाशिम

टॅग्स :washimवाशिमtraffic policeवाहतूक पोलीस