शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धोडप येथील हत्या प्रकरण: सख्खा भाऊच निघाला संदीपचा मारेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 13:53 IST

संदीप याची हत्या सख्खा भाऊ प्रदीप याने अन्य तीन जणांच्या मदतीने केल्याचेही स्पष्ट झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : धोडप उगले ता. रिसोड येथील संदीप शेषराव बकाल याचा मृत्यू नसून, हत्या केल्याची बाब पोलीस तपासातून सोमवारी समोर आली. या प्रकरणात   संदीप याची हत्या सख्खा भाऊ प्रदीप याने अन्य तीन जणांच्या मदतीने केल्याचेही स्पष्ट झाले.२६ नोव्हेंबर रोजी हरविलेल्या संदीप बकाल याचा मृतदेह ६ डिसेंबर रोजी रिसोड ते वाशिम मार्गावरील आसेगावजवळील पैनगंगा नदी पात्रात संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. संदीप शेषराव बकाल (२८) हा आपल्या गावावरून २६ नोव्हेंबर २०१९ रोजी वाशिमला निघाला होता. त्यादिवशी वाशिमहून संदीप हा आपल्या मामाच्या गावी रिठद येथे पोहोचला. तिथे आपल्या मामाला भेटल्यानंतर पेट्रोल भरून येतो असे सांगून तिथून गावाकडे निघाला. मात्र तो आपल्या मूळ गावी धोडप किंवा आपल्या मामाच्या गावी रिठद येथे पोहोचला नसल्याने मृतक संदीपच्या नातेवाईकांनी रिसोड येथील पोलीस स्टेशनला ३० नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदवली. त्यानंतर नातेवाईकांसह पोलीस त्याचा शोध घेत होते. ६ डिसेंबर रोजी सकाळी पैनगंगा नदीतील जुन्या पुलाजवळ गावकऱ्यांना पाण्यावर तरंगताना मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. संदीप बकाल याची हत्या ही सख्खा भाऊ प्रदीप शेषराव बकाल याने अन्य तीन जणांच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. पोलीस तपासातून संदीपचे एका मुलीसोबत एकतर्फी प्रेम होते तसेच संदीपला अन्य छंद असल्याने या घटनेचा तपास नेमका कसा करावा, याचा पेच पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाला होता. शेवटी पोलिसांनी मृतकाचा सख्खा भाऊ प्रदीप बकाल, राहुल गजानन इंगोले, संतोष ऊर्फ गोलू रतन इंगोले, रामप्रसाद सुभाष इंगोले आदींची कसून चौकशी केली असता, प्रदीप याने उपरोक्त तिघांच्या मदतीने संदीपची हत्या करून प्रेत आसेगाव पेन येथील नदीच्या पाण्यात फेकून दिल्याचे पोलीस तपासातून समोर आले. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे व त्यांच्या चमूने केला.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीMurderखून