शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ५३ प्रकल्पातून होणार गाळाचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 14:34 IST

वाशिम: महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या गाळमूक्त धरण, गाळयुक्त शिवारसह जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५३ प्रकल्पांतून गाळाचा उपसा आणि तीन बंधाºयांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या गाळमूक्त धरण, गाळयुक्त शिवारसह जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५३ प्रकल्पांतून गाळाचा उपसा आणि तीन बंधाºयांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी २ कोटी ४७ लाख २१ हजार ६५४ रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली असून, संबंधिताना या कामांसाठी जेसीबीची मागणी नोंदविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जलसंधारणाची कामे बंद करण्यात आली होती. तथापि, गाळमूक्त धरण, गाळयुक्त शिवार या अभियानामुळे शेतकºयांना दुहेरी फायदा होतो. धरणांची खोली वाढून अधिक जलसंचय झाल्याने पाणीटंचाईसह सिंचन समस्येवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होते, तसेच धरणातील गाळामुळे शेतजमीनही सुपिक होण्यास मदत होते. आचारसंहितेमुळे हे अभियानही थांबले होते; परंतु पुढे पावसाळा लागणार असल्याने या अभियानातून कामे करणे शक्य होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगानेच या अभियानातील कामे करण्यास मुभा दिली आहे. त्यानंतर या अभियानाचे जिल्हास्तर अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या अधिकार कक्षेनुसार गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारसह जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २ कोटी ४७ लाख २१ हजार ६५४ रुपयांच्या खर्चाच्या ५६ कामांना मान्यता दिली आहे. यामुळे संबंधित प्रकल्पांची खोली वाढून मोठ्या प्रमाणात जलसंचय होईल, तसेच शेतकºयांना या गाळामुळे जमीन सुपिक करण्यासही मदत होणार आहे.  शेतकºयांना मोफत गाळजिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार गाळमूक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानातील कामांतून निघणारा गाळ शेतकºयांना मोफत दिला जाणार आहे. ही कामे प्रशासकीय यंत्रणेमार्फत जेसीबी मशीनने करण्यात येणार असून, यासाठी मागणी नोंदविण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. शेतकºयांना केवळ गाळ शेतापर्यंत वाहून नेण्यासाठी स्वत: ट्रॅक्टर किंवा इतर वाहनांचा खर्च करावा लागणार आहे.

टॅग्स :washimवाशिमDamधरण