शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

‘व्हॅक्सीन’ वाहतूकीच्या मोबदल्यापासून ‘एमपीडब्ल्यू’ वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 6:17 PM

आरोग्य सहायकांनी कामात टाळाटाळ चालविल्याने ‘व्हॅक्सीन’ची वाहतूक ‘एमपीडब्ल्यू’ (बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी) यांना करावी लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुक्यातील काटा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया उपकेंद्रांवर होणाºया लसीकरण कार्यक्रमांसाठी ‘व्हॅक्सीन’ पोहचविण्याची जबाबदारी आरोग्य सहाय्यकांवर असते. त्यासाठी संबंधितास ७५ रूपये मोबदला देखील दिला जातो; परंतु आरोग्य सहायकांनी कामात टाळाटाळ चालविल्याने ‘व्हॅक्सीन’ची वाहतूक ‘एमपीडब्ल्यू’ (बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी) यांना करावी लागत आहेत. यासाठी मात्र त्यांना कुठलाही मोबदला दिला जात नसल्याने त्यांच्यात रोष व्यक्त होत आहे. लसीकरणामुळे बाल्यावस्थेपासून वृध्दावस्थेपर्यंत २५ विविध आजारांपासून संरक्षण मिळते. जगभरात लसीकरण प्रतिबंधक रोगाविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य विभागाकडून वेळोवेळी प्रयत्न केले जातात. लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा व अत्यंत सोपा असा मार्ग आहे. एक वर्षाच्या आत बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. दरम्यान, या लसीकरणासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यकांना त्या-त्या केंद्राअंतर्गत येणाºया उपकेंद्रामध्ये ज्यादिवशी लसीकरण असते, त्या दिवशी ‘व्हॅक्सीन’ पोहचविण्याची जबाबदारी सांभाळावी लागते. त्यासाठी ७५ रूपये मोबदला देखील दिला जातो. मात्र, काटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ‘व्हॅक्सीन’ची वाहतूक आरोग्य सहाय्यकाऐवजी ‘एमपीडब्ल्यू’ कर्मचाºयांना कुठलाही मोबदला न देता (फुकटात) करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याची माहिती एका कर्मचाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. या सर्व प्रकाराची चौकशी वरिष्ठ स्तरावरून व्हावी, अशी मागणीही जोर धरत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्रामध्ये लसीकरण मोहिम असेल तर त्या ठिकाणी ‘व्हॅक्सीन’ घेऊन जाण्याची जबाबदारी ही आरोग्य सहाय्यकावरच असते. त्यांना यासाठी ७५ रूपये मोबदलाही शासनाकडून दिला जातो. काटा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ‘व्हॅक्सीन’ची वाहतुक कोण करतो, याकडे यापुढे कटाक्षाने लक्ष पुरविले जाईल. डॉ. राजेश डावरे तालुका वैद्यकीय अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम