शकुंतला रेल्वेप्रकरणी खासदारांची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:39 AM2021-04-13T04:39:32+5:302021-04-13T04:39:32+5:30

खासदार भावना गवळी यांनी २००६-०७ पासून या रेल्वेसंदर्भात पाठपुरावा केल्यामुळे यवतमाळपासून मध्य रेल्वेच्या मूर्तिजापूरला जोडणाऱ्या ११३ किलोमीटर अंतर असलेल्या ...

MPs discuss railway issue with Shakuntala Railway Minister! | शकुंतला रेल्वेप्रकरणी खासदारांची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा !

शकुंतला रेल्वेप्रकरणी खासदारांची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा !

Next

खासदार भावना गवळी यांनी २००६-०७ पासून या रेल्वेसंदर्भात पाठपुरावा केल्यामुळे यवतमाळपासून मध्य रेल्वेच्या मूर्तिजापूरला जोडणाऱ्या ११३ किलोमीटर अंतर असलेल्या या रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाकरिता तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २१४७.४४ कोटी रुपये या मीटरगेज रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याकरिता मंजूर केले होते. १९१३ पासून आजही ब्रिटिशांच्या निक्सन कंपनीची मालकी शकुंतला रेल्वेवर असल्यामुळे अडचणी निर्माण होतात. खासदार गवळी यांनी रेल्वेमंत्र्यांना व रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांना वारंवार भेटून शकुंतलेची इंग्रजांची ब्रिटिश कंपनीची निक्सन कंपनीची असलेली मालकी काढण्याकरिता ३ पर्याय दिले होते. रेल्वेमंत्री गोयल यांची भेट घेऊन निक्सन कंपनीच्या मागणीचा एकत्रित तोडगा करून शकुंतलेचा प्रश्‍न निकाली काढण्याकरिता खासदार गवळी यांनी चर्चा केली. रेल्वे मंत्रालयाने यावेळी २१४७.४४ कोटी रुपयांची तरतूद केलेल्या या रेल्वे ब्रॉडगेजला कुठलीही जमीन संपादन करण्याची गरज नसून निक्सन कंपनीची मालकी या मार्गावरून काढावी, अशी मागणी केली. याबाबत रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली.

Web Title: MPs discuss railway issue with Shakuntala Railway Minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.