शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

खासदार भावना गवळींनी केली रेल्वे स्टेशन पार्किंग ठेकेदाराची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 2:20 PM

ठेकेदाराची कानऊघाडणी करून तासभर कुठलेही वाहन पार्कींगमध्ये असल्यास शुल्क न आकारण्याचे निर्देश दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील रेल्वे स्टेशनच्या बाहेर वाहन पार्कींगचा कंत्राट सांभाळणाऱ्या ठेकेदाराने चक्क खासदार भावना गवळी यांच्याशीच उद्धटपणा केला. यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले. दरम्यान, खासदार गवळी यांनी यावेळी संबंधित ठेकेदाराची कानऊघाडणी करून तासभर कुठलेही वाहन पार्कींगमध्ये असल्यास शुल्क न आकारण्याचे निर्देश दिले. त्याचे पालन न केल्यास याद राखा, असा दमही त्यांनी यावेळी भरला.वाशिम रेल्वेस्टेशन परिसरात वाहन पार्कींगचा कंत्राट असलेल्या ठेकेदाराकडून प्रवासी व आॅटोचालकांना उद्धटपणाची वागणूक मिळते, नियमबाह्य पद्धतीने वाहन पार्कींगचे पैसे आकारले जातात, त्याचची पावती कोºया कागदावर दिली जाते. वाहनधारकांना दमदाटी करणे, वाहनांमधील हवा सोडून देणे असे प्रकारही होत असल्याची तक्रार काही नागरिकांनी खासदार भावना गवळी यांच्याकडे केली होती. दरम्यान, रविवारी गवळी यांनी रेल्वे स्टेशन गाठून याबाबतची खातरजमा केली असता, नागरिकांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यानंतर संबंधित ठेकेदारास बोलावून नियमबाह्य प्रकार बंद करण्याबाबत सांगत असताना ठेकेदाराने खासदार गवळी यांच्याशी देखील उद्धटपणा केला. त्यामुळे त्याठिकाणी उपस्थित काही शिवसैनिक ठेकेदाराच्या अंगावर धावून गेले; मात्र सामंजस्याने तोडगा निघाल्याने प्रकरण निवळले. यापुढे एक तास कुठलेही वाहन पार्कींगमध्ये असल्यास त्याचे शुल्क आकारू नये, असे निर्देश खासदार गवळी यांनी संबंधित ठेकेदारास दिले. यावेळी गवळी यांनी रेल्वे स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले.

टॅग्स :washimवाशिमBhavna Gavliभावना गवळीWashim railway stationवाशिम रेल्वे स्टेशन