शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना विमा कवच देण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 16:38 IST

महसूल विभाग १ आॅक्टोबर रोजी संघटनेच्या पदाधिकाºयांशी चर्चा करणार आहे.

वाशिम : कोरोना काळात राज्यातील आरोग्य कर्मचारी, शिक्षकांना विमा कवच देण्यात आले. दुसरीकडे गावपातळीवर काम करणाºया तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना विमा कवच नसल्याने या संदर्भात संघटनेने शासनस्तरावर मागणी लावून धरली. याची दखल घेऊन महसूल विभाग १ आॅक्टोबर रोजी संघटनेच्या पदाधिकाºयांशी चर्चा करणार आहे.राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या या सार्वत्रिक साथीमध्ये सर्वेक्षण, शोध, उपचार, प्रतिबंध, चाचणी, मदतकार्य यांच्याशी संबंधित कर्तव्य बजावणाºया आरोग्य कर्मचाºयांसाठी २८ मार्च २०२० रोजी विमा कवच योजना लागू करण्यात आली. या योजनेची व्याप्ती वाढवित शिक्षक, अंगणवाडी कर्मचाºयांसह अन्य प्रवर्गातील कर्मचाºयांनाही विमा कवच लागू करण्यात आले. परंतू, गाव पातळीवर कोरोनाशी संबंधित कामे करणारा महत्वाचा दूवा असलेले राज्यातील तलाठी, मंडळ अधिकाºयांना अद्याप विमा कवच मिळाले नाही. या कर्मचाºयांनाही विमा कवच मिळावे यासह अन्य मागण्या तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने महसूल विभागाकडे लावून धरल्या. याची दखल घेत महसूल मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत १ आॅक्टोबर रोजी महसूल अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाºयांशी चर्चेचा प्राथमिक टप्पा म्हणून विभागीय आयुक्त, कोकण यांचे कार्यालय, मुंबई येथे बैठक पार पडणार आहे. महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाºयांना विमा कवच मिळावे, सामुग्रह अर्थसहाय्य मंजूर करावे यासह तलाठी, मंडळ अधिकाºयांच्या अन्य समस्यांवरही चर्चा होणार असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. कोरोनाशी संबंधित कामे करणारा तलाठी हा घटक अद्याप विमा कवचपासून वंचित आहे. याशिवाय तलाठी, मंडळ अधिकाºयांच्या अन्य मागण्याही प्रलंबित आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी १ आॅक्टोबर रोजी महसूल मंत्री व वरिष्ठ अधिकाºयांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाºयांशी बैठक होत आहे.- शाम जोशी, राज्य अध्यक्षतलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघ.

टॅग्स :washimवाशिमMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार