शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आजारी जावयाला सासूबाई देणार किडनीचे दान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 14:31 IST

लवकरच पुणे येथील दवाखान्यात संदिप काळे यांच्यावर ‘किडनी ट्रान्सप्लान्ट’ची शस्त्रक्रिया होणार आहे.

- शंकर वाघ लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : शिरपूर येथे वास्तव्यास असलेले संदिप काळे (वय ३६ वर्षे) हे गत वर्षभरापासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यातून बरे व्हायचे असल्यास किडनी बदलावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले; मात्र महत्प्रयासानेही किडनी उपलब्ध होणे दुरापास्त झाले. अशावेळी संदिपच्या सासूबाई बेबीबाई भालेराव यांनी मुलींच्या सुखी संसारासाठी जावयाला किडनी दान देण्याचा निर्धार केला. यासंबंधीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून लवकरच पुणे येथील दवाखान्यात संदिप काळे यांच्यावर ‘किडनी ट्रान्सप्लान्ट’ची शस्त्रक्रिया होणार आहे. दरम्यान, जावयासाठी सासूबार्इंनी किडनी दान देण्याची दर्शविलेली तयारी हा चर्चेचा तद्वतच प्रेरणादायी विषय ठरला.शिरपूर येथील रहिवासी तथा काही वर्षांपासून पुणे येथे एका खासगी कंपनीत कामाला असलेल्या संदिप काळे यांच्या दोन्ही किडन्या वर्षभरापासून खराब झाल्या. यामुळे ते त्रस्त झाले असून किमान एक किडनी बदलली तरी जगणे सुसह्य होऊ शकते, असा सल्ला डॉक्टरांनी दिला; मात्र किडनी देणार कोण, हा मोठा प्रश्न होता. अशावेळी शिरपूर येथेच वास्तव्यास असलेल्या संदिप काळे यांच्या सासूबाई बेबीताई वसंतराव भालेराव यांनी जावयाला स्वत:ची किडनी दान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी त्यांनी पुण्याला जाऊन वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली.संदिप काळे हे तरूण असून त्यांच्या सासूबाई त्यांना किडनी देणार असल्याने संदिपची पत्नी तथा बेबीताई यांची मुलगी दिपिका काळे, आठ वर्षीय मुलगा प्रथमेश व पाच वर्षे वयाची मुलगी स्वरा या कुटूंबावर ओढवलेले संकट दुर होणार आहे. तथापि, बेबीताई भालेराव यांनी आपल्या मुलीच्या सुखी संसारासाठी घेतलेल्या या पुढाकाराचे व दाखविलेल्या धाडसाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

जावयांना किडनीच्या आजाराने पछाडले होते. यामुळे माझ्या मुलीचे कुटूंब उध्वस्त होण्याच्या मार्गाप्रत पोहचले होते. जावई आणि मुलगी तरूण असून अशात त्यांच्यावर ओढवलेले संकट मला पाहवले गेले नाही. त्यामुळेच जावईबापूंना एक किडनी दान करण्याचा निर्धार केला आहे.- बेबीताई भालेरावशिरपूर जैन, ता. मालेगाव

टॅग्स :washimवाशिमSocialसामाजिक