लोकमत न्यूज नेटवर्कउंबर्डाबाजार र : येथील इंदीरानगर झोपडपट्टी भागात राहणाऱ्या गणेश मारोटकर यांच्या घराला १४ जानेवारी रोजी लागलेल्या भिषन आगीत मृत्यू झालेल्या सुमन वसंत मारोटकर , पंचफुला मारोती गुहाडे या मायलेकींवर १५ जानेवारी रोजी सोमठाणा मार्गावरील स्मशान भूमीत एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वत्र शोकमग्न वातावरण निर्माण झाले होते. प्रसंगी स्मशान भूमीवर झालेल्या शोकसभेत माजी आमदार प्रकाश डहाके, जि. प.सदस्य उस्मान भाई गारवे , माजी सरपंच डॉ.धनराज इंगोले सिध्दार्थ देवरे , दत्ता भाऊ तुरक , आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. अंत्ययात्रेला सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगीत एक लाख दहा हजार सहाशे रूपयांचे साहीत्य खाकउंबर्डाबाजार र येथील इंदीरानगर झोपडपट्टी भागात राहणाºया गणेश मारोटकर यांच्या घराला १४ जानेवारी रोजी लागलेल्या भिषण दोन महिलांचा मृत्यू होवून घरातील संपुर्ण साहित्य खाक झाले होते. १५ जानेवारी रोजी उंबर्डाबाजार विभागाचे मंडळ अधिकारी चौधरी व पटवारी मुंडाळे यांनी प्रत्यक्ष घटना स्थळाला भेट देवून पंचनामा केला असता गहू सोयाबीन रोकड टिव्ही गाद्या सोने टिन लाकडी बल्या दरवाजे खिडक्यां गॅस सिलिंडर तथा अन्य साहित्य असा १ लाख १० हजार ६०० रूपयांचे साहीत्य जळून खाक झाल्याचे पंचासमक्ष नमुद करण्यात आले.
होरपळून मृत्यू झालेल्या मायलेकींवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 16:36 IST