शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बहुतांश ई-क्लास जमिनीवर वृक्ष लागवडच नाही ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 17:28 IST

काही ग्रामपंचायती अंतर्र्गत ई-क्लास जमिनीवर वृक्ष लागवड पूर्ण झालेली नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्क              वाशिम: शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात ४० लाख वृक्ष लावण्यात येत आहेत. ही मोहीम वेगात सुरू आहे; परंतु वृक्ष लागवडीसाठी सर्वात पुरक आणि फायदेशीर असलेल्या  ई-क्लास जमिनीवर अद्याप वृक्ष लागवड पूर्ण झाली नसल्याचे दिसत आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी याची दखल घेऊन वृक्ष लागवडीला वेग देणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरण प्रेमींच्यावतीने व्यक्त होत आहे. राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत वाशिम जिल्ह्यासाठी ४० लाख ३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी वृक्षरोपे उपलब्ध करण्याची जबाबदारी सामाजिक वनीकरण आणि वनविभागाकडे असून, या दोन्ही विभागांनी निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षरोपे उपलब्धही केली आहेत. जिल्ह्यात निर्धारित उद्दिष्टापैकी अधिकाधिक वृक्ष लागवड ही ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया ई-क्लास जमिनीवर होणार आहे. यासाठी सामाजिक वनीकरण विभागांतर्गत १० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले असून, ग्रामपंचायत निहाय उद्दिष्टही निश्चित करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी काही ग्रामपंचायतींनी ई-क्लासवर अधिकाधिक वृक्ष लागवडीसाठी लोकसहभाग वाढावा म्हणून विविध उपक्रमही राबविले आणि त्याचा मोठा फायदा झाला. अनेक ग्रामपंचायतींनी निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड जुलै महिन्यातच केली. तथापि, अद्यापही काही ग्रामपंचायती अंतर्गत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निम्मेही झाले नाही. मधल्या काळात पावसाने दडी मारल्याने वृक्ष लागवड मोहिमेत खोळंबा निर्माण झाला होता; परंतु आता जिल्ह्यात १० ते १२ दिवस सतत पाऊस पडला आणि तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीपही दिली आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीला वेग मिळणे अपेक्षीत होते; परंतु अद्यापही काही ग्रामपंचायती अंतर्र्गत ई-क्लास जमिनीवर वृक्ष लागवड पूर्ण झालेली नाही. 

वृक्ष लागवडीचा सतत आढावा जिल्हाधिकारी घेत आहेत. पूर्वी पावसाअभावी आणि नंतर सततच्या पावसामुळे वृक्ष लागवड थांबली होती. आता वृक्ष लागवडीला वेग देण्यात आला असून, आमचे ६० टक्के उद्दिष्टही पूर्ण झाले आहे. नियोजित ई-क्लास जमिनीवर निर्धारित मुदतीपूर्वीच वृक्ष लागवड करण्यात येणार असून, यासाठी ग्रामपंचायतींना सुचनाही देण्यात आल्या आहेत. -उत्तमराव फडसहाय्यक वनसंरक्षकसामाजिक वनीक रण, वाशिम

टॅग्स :washimवाशिमforestजंगल