सकाळच्या सत्रात भरणार माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:41 IST2021-03-20T04:41:07+5:302021-03-20T04:41:07+5:30

वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याने १८ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या शाळा पुन्हा बंद ...

The morning session will be filled by secondary, high school | सकाळच्या सत्रात भरणार माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा

सकाळच्या सत्रात भरणार माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा

वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याने १८ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. परंतु शालांत परीक्षेच्या पार्श्वभूमीवर या शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १७ मार्च रोजी झालेल्या बैठकीत शिक्षण विभागाला याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार २२ मार्चपासून या शाळा सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत सुरू केल्या जाणार आहेत.

दहावी आणि बारावीच्या शालांत परीक्षा तोंडावर आल्या आहेत. या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याबाबत शिक्षण विभागाचा निर्णय झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची पुरेसी तयारी झाली नाही. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव व्हावा, तसेच अभ्यासक्रमही पूर्ण करता यावा, या उद्देशाने मुख्याध्यापक संघ, जिल्हा परिषद शिक्षण विभागाची बैठक १७ मार्च रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आयोजित केली होती. या बैठकीत माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याबाबत मुख्याध्यापक संघाने अनुकूलता दर्शविली असून, तसेही पत्रही मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे दिले आहे. यानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या शाळा २२ मार्चपासून सकाळच्या सत्रात सुरू करण्याबाबतचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले असून, माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी याची अमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व शासकीय माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांसह खासगी शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांना दिल्या आहेत.

Web Title: The morning session will be filled by secondary, high school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.