शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वी भोपळपेंड नदीच्या नाल्यांचे खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 15:00 IST

आसेगाव (वाशिम) : पावसाळा तोंडावर आला असताना भोपळपेंड नदीला जोडणाºया नाल्यांना पूर येऊन शेतकºयांचे नुकसान व दळणवळण ठप्प होऊ नये म्हणून महसूल विभागाच्यावतीने या नाल्यांतीन गाळ, कचरा काढून त्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (वाशिम) : पावसाळा तोंडावर आला असताना भोपळपेंड नदीला जोडणाºया नाल्यांना पूर येऊन शेतकºयांचे नुकसान व दळणवळण ठप्प होऊ नये म्हणून महसूल विभागाच्यावतीने या नाल्यांतीन गाळ, कचरा काढून त्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात येत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी दलेलपूर आणि नांदगावदरम्यान वाहणाºया भोपळपेंड नदीला आसेगाव परिसरातील सार्सी, नांदगाव, आसेगाव आणि चिंचोली परिसरातील अनेक नाले जोडले आहेत. या नाल्यांची अनेक वर्षांपासून साफसफाई झालेली नाही. या नाल्यात गाळ, कचरा साचला आहेच शिवाय नाल्यांत झुडपेही वाढली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या नाल्यांना पूर येऊन मार्गावरील वाहतूक ठप्प होते. त्याचा फटका संबंधित गावांतील लोकांना सहन करावा लागतो. गंभीर आजारावर उपचारासाठी तातडीने शहराच्या ठिकाणी पोहोचता येत नाही. त्यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची भिती असते. शिवाय खरीप हंगामात शेतीसाठी विविध साहित्यांची नेआण करणाºया शेतकरी, शैक्षणिक प्रवास करणारे विद्यार्थी, महत्त्वाच्या कामांसाठी शहरात जाणाºया ग्रामस्थांनाही यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो, तसेच नाल्याकाठच्या शेतांत पाणी घुसल्याने शेतकºयांचे अतोनात नुकनसान होते. ही समस्या दूर करण्यासाठी महसूल विभागाने पावसाळ्यापूर्वी भोपळपेंड नदीला जोडणाºया आसेगाव-धानोरा मार्गावरील पुल, तसेच नांदगावनजिकच्या नाल्यांसह प्रत्येक नाल्यातील गाळ आणि कचरा काढण्यासह या नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे या नाल्यांना पूर न येता पावसाचे पाणी थेट नदीपात्रात पोहोचणार आहे. त्यामुळे परिसरातील जलपातळीही वाढणार असून, लोकांची वाहतुकीची समस्या दूर होणार आहे. तथापि, या नदीला जोडणाºया नाल्यावर मंगरुळपीर-अनसिंग मार्गावर शिवणी आणि नांददरम्यान असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने येथील समस्या दूर होणार नाही. त्यामुळे या पुलाची उंची वाढविणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.   शिवणीच्या ग्रामस्थांनी केले होते आंदोलनभोपळपेंड नदीवर नांदगावनजिक असलेला पूल, तसेच इतर नाल्यांचे अनेक वर्षांपासून खोलीकरण न केल्याने या नाल्यांना पूर येऊन दरवर्षी शेतात पाणी घुसते. त्यामुळे पिके वाहून जातात आणि शेतकºयांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. प्रशासनाने ही समस्या दूर करण्यासाठी नाल्यांचे खोलीकरण करावे, या मागणीसाठी महिनाभरापूर्वी शिवणी दलेलपूरसह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी मंगरुळपीर तहसील कार्यालयासमोर आंदोलनही केले होते.

टॅग्स :washimवाशिमriverनदी