शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सावधान...मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांना जडतोय मानसिक आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 11:56 IST

Beware of Mobile over use वेळीच सावध होऊन मोबाईलपासून मुलांना दूर ठेवावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क vवाशिम : गत सात महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाइलचा वापर वाढल्याने मुलांमध्ये डोकेदुखीबरोबरच मानसिक आजारही बळावत असल्याचे समोर येत आहे. पालकांनी वेळीच सावध होऊन मोबाईलपासून मुलांना दूर ठेवावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.कोरोनामुळे सर्वच क्षेत्र प्रभावित झाले असून, यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप, संगणकावरील स्क्रीन टाईम वाढला आहे. गत सात महिन्यांपासून मुलांची मोबाईलशी घट्ट मैत्री झाल्याने याचे दुष्परिणामही समोर येत आहेत. मोबाईल, संगणकावर सतत ऑनलाईन राहिल्यामुळे डोळे, मेंदुवर ताण पडतो. त्यामुळे साहजिकच डोकेदुखीचा त्रास जाणवत असून चिडचिडही वाढत आहे. मेंदूवर जास्त ताण आल्यास अभ्यासात मन लागत नाही, अतिवापरामुळे मुलांना मोबाईलचे व्यसन जडत असल्याने मानसिक आजार बळावत असल्याचे मेंदु व मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. 

हे आहेत दुष्परिणाममुलांमध्ये मोबाईल बघण्याचे प्रमाण वाढल्याने स्थूलपणा, पचनसंस्थेचे आजार, चिडचिडेपणा, नैराश्य, अस्वस्थपणा, निरूत्साह वाढीस लागला. एकलकोंडेपणा, इतरांना मारणे, वस्तू फेकणे किंवा तोडणे, अतिचंचलता, जिद्दी व हट्टीपणा वाढला आहे. आदी लक्षणे असणाऱ्या मुलांना बालरोग, मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.

मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये एकाग्रता राहत नसून, एकलकोंडेपणा वाढीस लागत आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणकावरील स्क्रीन टाईम वाढल्याने नैराश्य, मानसिक आजार जडत आहेत.- डॉ. नरेश इंगळेमानसोपचार तज्ज्ञ,  वाशिम

मोबाईलपासून मुलांना शक्यतोवर दूरच ठेवणे गरजेचे आहे. अलिकडच्या काळात मुले मोबाईलच्या आहारी जात असल्याने नैराश्य, चिडचिड वाढत आहे. पालकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.- डॉ. राम बाजड,  बालरोग तज्ज्ञ, वाशिम

टॅग्स :washimवाशिमMobileमोबाइलonlineऑनलाइन