शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आमदारांसह पदाधिकारी काँग्रेससोबतच, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर स्पष्टीकरण

By संतोष वानखडे | Updated: February 12, 2024 18:34 IST

काँग्रेसचा एक मोठा गट महायुतीत सहभागी होणार असल्याच्या रंगल्यात चर्चा

वाशिम: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व आमदारकीचा राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात पडसाद उमटत आहेत. वाशिम जिल्ह्यात मात्र काँग्रेसच्या एकमेव आमदारासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेससोबत असून, तसे आमदारांनी स्पष्ट केले.

गत दीड वर्षांत राज्याच्या राजकारणात दोन प्रमुख भूकंप झाले. काँग्रेसचा एक मोठा गट महायुतीत सहभागी होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. सोमवारी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. चव्हाण यांच्यासोबत काॅंग्रेसचे काही आमदार असून, त्यामध्ये रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांचेही नाव आले होते. मात्र, झनक यांनी तातडीने याबाबत स्पष्टीकरण दिले असून, काॅंग्रेस पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात कधीच येणार नाही, असे ते म्हणाले. झनक यांनी एक व्हिडीओ जारी केला असून, व्हाटस ॲप स्टेट्सही ठेवले होते. यामध्ये ते म्हणतात की, आज सकाळपासून माझ्या राजीनाम्याबाबतची जी बातमी समोर येत आहे, ती चुकची आहे. काॅंग्रेस पक्षाने आमच्या झनक कुटुंबियावर अतिशय प्रेम केले, काॅंग्रेसने आम्हाला भरपूर दिले आहे. काॅंग्रेस पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात कधीच येणार नाही, असे म्हणत झनक यांनी आपण काॅंग्रेस पक्षातच असल्याचे स्पष्ट केले. याबरोबरच जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व काॅंग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील आपण काॅंग्रेसमध्येच असल्याचे स्पष्ट केले...........कोट

माझ्या राजीनाम्याबाबतचे वृत्त खोटे आहे. काॅंग्रेस पक्षाने आम्हाला भरपूर दिले आहे. काॅंग्रेस पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात कधीच येणार नाही.

- अमित झनक, आमदाररिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघ

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण