शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाविरोधात आमदाराची महावितरणच्या कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 15:21 IST

आमदार अमित झनक यांनी १५ आॅक्टोबर रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियतां कार्यालयावर धडक देत १५ दिवसांत विद्युतविषयक समस्या निकाली काढाव्या अन्यथा तिव्र आंदोलन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महावितरणच्यावतीने भारनियमन घेतले जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याविरोधात आवाज उठवित आमदार अमित झनक यांनी १५ आॅक्टोबर रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियतां कार्यालयावर धडक देत १५ दिवसांत विद्युतविषयक समस्या निकाली काढाव्या अन्यथा तिव्र आंदोलन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.सध्या जिल्ह्यात विजेच्या तुटीचे कारण समोर करून काही फिडरवरून भारनियमन सुरू करण्यात आले आहे. विद्युतविषयक समस्यांचा निपटारा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकºयांनी आमदार झनक यांच्याकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने शेतकरी, काँग्रेस, युवक काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह झनक यांनी सोमवारी महावितरणचे कार्यालय गाठून अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांच्याशी चर्चा केली. यावेळी रिसोड, मालेगाव तालुक्यात विद्युत रोहित्रात बिघाड झाल्यानंतर विद्युत रोहित्र बदलून देण्यास विलंब होत आहे, काही गावांत तर लाईनमनच नाही, जळालेले विद्युत रोहित्र बदलून देण्यापूर्वी पैशाची मागणी केली जाते आदी समस्या शेतकºयांनी मांडल्या. वाघी येथे दोन वर्षांपासून लाईनमन नाही, खंडाळा वीज उपकेंद्र येथील ट्रान्सफॉर्मर कामरगाव येथे हलविणे यावरून शेतकºयांनी आक्रमक रुप धारण केले होते. रिसोड व मालेगाव तालुक्यातील शेतकºयांच्या विद्युतविषयक समस्या लक्षात घेता १५ दिवसांच्या आत निपटारा करावा, अशा सूचना आमदार झनक यांनी बेथारिया यांना केल्या. विद्युतविषयक समस्यांचा निपटारा केला जाईल, असे आश्वासन बेथारिया यांनी दिले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबुराव शिंदे, जि.प. सभापती सुधीर गोळे, पं.स. सभापती गजानन भोने, गजानन गोटे, सोनुबाबा सरनाईक, मोहन इंगोले, सलीम गवळी, गणेश भालेराव, गजानन इरतकर भगवानराव शिंदे यांच्यासह शेकडो शेतकरी, कांँग्रेस पदाधिकाºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण