शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेण्या आजारांपासून बचावासाठी प्रभावी ठरणार ‘मिशन इंद्रधनुष्य’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 14:27 IST

२ डिसेंबरपासून ‘मिशन इंद्रधनुष्य २.०’ ही विशेष मोहिम चार टप्प्यात राबविण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गर्भवती महिला व बालकांमधील जीवघेण्या आजारांवर नियंत्रण मिळवून माता-बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात २ डिसेंबरपासून ‘मिशन इंद्रधनुष्य २.०’ ही विशेष मोहिम चार टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यामाध्यमातून २३७ गरोदर महिला व १४६० बालकांचे लसीकरण करून त्यांना विविध आजारांपासून सुरक्षित केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी शनिवार, ३० नोव्हेंबरला दिली.क्षयरोग, कावीळ, पोलीओ, गोवर, घटसर्प, डांग्या खोकला यासह अन्य आजारांसाठी लसीकरण केल्याने गरोदर माता व बालकांना सुरक्षितता येते. त्यानुषंगाने जिल्ह्यातील जोखीमग्रस्त भागातील शून्य ते दोन वर्षे वयोगटातील जी बालके आणि गरोदर माता सर्वेक्षणानुसार लसीकरणापासून वंचित आहेत, त्यांच्यासाठी ‘मिशन इंद्रधनुष्य २.०’ हे २ डिसेंबरपासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी मोडक यांनी सांगितले, की युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने २ डिसेंबर २०१९, ६ जानेवारी २०२०, ३ फेब्रुवारी २०२० आणि २ मार्च २०२० अशा चार टप्प्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोहिम राबविण्यात येईल. पहिल्या टप्प्यात, २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या १६२ आरोग्य सेवा सत्राव्दारे जोखीमग्रस्त भागातील सर्वेक्षणानुसार गरोदर महिला व बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील १६७ आणि शहरी भागातील ७० अशा एकूण २३७ गरोदर महिला आणि शून्य ते २ वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील ९०० आणि शहरी भागातील ५६० अशा एकूण १४६० बालकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगतले.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य