वर्षभरातच झाली मालेगावातील रस्त्याची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:41 AM2021-07-31T04:41:53+5:302021-07-31T04:41:53+5:30

मालेगाव : येथील नगरपंचायतअंतर्गत वेगववेगळ्या प्रभागांत वर्षभरापूर्वी रस्त्यांची कामे करण्यात आली. ही कामे करताना नियम आणि अंदाजपत्रकांचे भान ठेवण्यात ...

The misery of the road in Malegaon happened throughout the year | वर्षभरातच झाली मालेगावातील रस्त्याची दैना

वर्षभरातच झाली मालेगावातील रस्त्याची दैना

Next

मालेगाव : येथील नगरपंचायतअंतर्गत वेगववेगळ्या प्रभागांत वर्षभरापूर्वी रस्त्यांची कामे करण्यात आली. ही कामे करताना नियम आणि अंदाजपत्रकांचे भान ठेवण्यात आले नाही. त्यामुळे सर्वच रस्त्यांची कामे सुमार दर्जाची झाली असून, प्रभाग क्रमांक १२ मध्ये वर्षभरापूर्वी करण्यात आलेला पेव्हर ब्लॉकचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या खराब रस्त्यामुळे नगरपंचायत बांधकाम विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रभाग क्रमांक १२ मध्ये आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधीअंतर्गत नगरपंचायतीच्या देखरेखीखाली पेव्हर ब्लॉक रस्त्याचे काम करण्यात आले. हा पेव्हर ब्लॉकचा रस्ता अंदाजपत्रकानुसार बनवलेल्या गेला नाही. त्या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. त्यामुळे तो रस्ता वर्षाच्या आतच उखडला असून, त्या रस्त्यावर अपघात होत आहेत. यासंदर्भात २६ जुलै २०१९ ला जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय व आमदार राजेंद्र पाटणी यांनाही स्मरणपत्र देऊन चौकशीची मागणी करण्यात आली आहे. कुसुम सावले, मेघा महाजन, साधना महाजन, अलका गोरे, पद्मा जैन, कांताबाई वाळले, पूनम जैन, लता वाळूकर, प्रेरणा गोरे, आरती टिकाईत, पूजा हरणे, सरला तोंडे, निर्मला तोंडे, सुरेखा तोंडे, आशा हरणे, कुसुम दंडगे, प्रियंका दंडगे, रेखा काटेकर आदी महिलांनी या रस्त्याचे काम पुन्हा करण्याची मागणी केली. यासंदर्भात २९ ऑक्टोबर २०२० रोजी तक्रार करण्यात आली आणि २ जानेवारी २०२१ रोजीच्या मासिक सभेत ठराव घेण्यात आला, तरी तो रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही.

---------

नागरिकांत नाराजीचे वातावरण

नागरिक स्वत:च्या सोयी-सुविधांसाठी नगरसेवकांना निवडून देतात. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडविणे, त्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करणे, हे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे, परंतु मालेगाव येथे रस्ता दुरुस्तीची मागणी नागरिक वारंवार करीत असतानाही त्याची दखल घेण्यात येत नसल्याने लाेकप्रतिनिधींबाबत नागरिकांच्या मनात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.

300721\img-20210727-wa0058.jpg

रस्ता

Web Title: The misery of the road in Malegaon happened throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.