शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जूनी पेन्शनसंदर्भात लोकप्रतिनिधी, उपविभागीय अधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 14:27 IST

जुनी पेंशन योजना लागू करावी, अशी मागणी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने ३ जून रोजी आमदार राजेंद्र पाटणी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) - १ नोव्हेंबर २००५ पूर्वी शाळेवर रूजू झालेल्या; परंतू नोव्हेंबर २००५ नंतर अनुदान मिळालेल्या शाळेवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करावी, अशी मागणी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने ३ जून रोजी आमदार राजेंद्र पाटणी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देण्यापुर्वी आमदार राजेंद्र पाटणी यांच्याशी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी पेन्शनच्या बाबतीत कसा अन्याय झाला हे पटवुन दिले. बरेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांची नियुक्ती १९९७, १९९८, १९९९ मधील आहे. परंतू त्या-त्या शाळेला १०० टक्के अनुदान एक नोव्हेंबर २००५ नंतर आले. या कारणावरून या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना जूनी पेन्शन नाकारली आहे. जूनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. परंतु या संघर्षाला  शासन, प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही, अशी आपबिती यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी मांडली. यावर आमदार पाटणी म्हणाले की, तुमच्या जुन्या पेंशनचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडणार असून, न्याय देन्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार, असे आश्वासन दिले.त्यानंतर कारंजा उपविभागीय अधिकारी अनुप खाडे  यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा जूनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात निवेदन दिले. दोन्ही ठिकाणी निवेदन देतेवेळी कारंजा, मानोरा तालुक्यातील बहुसंख्य मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये मुख्याध्यापक विजय भड, मुख्याध्यापक पुरुषोत्तम म्हातारमारे, प्राचार्य बी.एल निंभोरकर, मुख्याध्यापक बी.बी पप्पूवाले, मुख्याध्यापक गजानन लाहे, प्राचार्य संदेश सोनोने, प्राचार्य व्हि.डी शिंदे, गजानन जाधव, प्रकाश मुंदे यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमEmployeeकर्मचारीRajendra Patniराजेंद्र पाटणी