शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकार्‍यांच्या वादात शवविच्छेदन खोळंबले; मालेगाव येथील गंभीर प्रकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:23 IST

मालेगाव: तालुक्यातील वाघळूद येथील शेतकरी किसन मस्के (वय ५५) यांनी रविवारी सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, शिरपूर पोलिसांनी सकाळी ११.३0 च्या सुमारास शवविच्छेदनासाठी मालेगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलविला; मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी शवविच्छेदनासाठी शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे कारण समोर करून शवविच्छेदनास तब्बल ४ तास विलंब लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देमृतदेहाची अवहेलना 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: तालुक्यातील वाघळूद येथील शेतकरी किसन मस्के (वय ५५) यांनी रविवारी सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, शिरपूर पोलिसांनी सकाळी ११.३0 च्या सुमारास शवविच्छेदनासाठी मालेगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलविला; मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी शवविच्छेदनासाठी शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे कारण समोर करून शवविच्छेदनास तब्बल ४ तास विलंब लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला.याबाबत प्राप्त माहितीनुसार, शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाची सोय नसल्याने पोलिसांनी किसन मस्के यांचा मृतदेह विनाविलंब मालेगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेला. घटनेचे गांभीर्य ओळखून तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप वाढवे यांनी शवविच्छेदन करणे क्रमप्राप्त होते; मात्र मृतदेहासोबत शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एस. करवते यांनी स्वत: येऊन शवविच्छेदन करायला हवे, अशी भूमिका घेऊन शवविच्छेदन थांबविण्यात आले, अशी माहिती डॉ. करवते यांनी दिली; मात्र याप्रकरणी डॉ. वाढवे यांच्याशी संपर्क साधला असता, स्वीपर हजर नसल्यानेच शवविच्छेदनास विलंब लागल्याचे ते म्हणाले. एकूणच केवळ दोन वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अंतर्गत वादामुळे मृतक शेतकर्‍याच्या शवविच्छेनास मात्र तब्बल ४ तास विलंब लागला. या गंभीर प्रकार प्रकरणी संबंधितांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमDeathमृत्यू