शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई उपाययोजनांच्या अंमलबजावणीस गती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 14:53 IST

‘लोकमत’च्या वृत्ताची तडकाफडकी दखल घेऊन प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ आखलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीस गती दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये सद्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने ‘लोकमत’ने विविधांगी वृत्त प्रकाशित करून या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, ‘लोकमत’च्या वृत्ताची तडकाफडकी दखल घेऊन प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ आखलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीस गती दिली आहे. त्यानुषंगाने विहिरींचे अधिग्रहण आणि अतीटंचाईग्रस्त गावांना विनाविलंब टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात उद्भवणारी पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ४ कोटी ५९ लाख ९४ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार केलेला आहे. याअंतर्गत जून २०१९ पर्यंत ५०४ गावांसाठी ४८१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ८ गावांमध्ये विंधन विहीर दुरुस्ती, ४ गावांमध्ये तात्पुरती नळ योजना, ३६ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा, तर ४३३ गावांमध्ये विहिर अधीग्रहणाच्या उपाययोजनांचा समावेश आहे.असे असले तरी जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू प्रकल्पांची पाणीपातळी कमालीची खालावल्याने तथा गावागावांमधील जलस्त्रोत कोरडे पडू लागल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण होवूनही अधिकांश गावांमध्ये डिसेंबर २०१८ मध्ये तयार झालेल्या पाणीटंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात प्रशासनाने दिरंगाईचे धोरण अवलंबिले होते. ११ एप्रिल रोजी पार पडलेल्या वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघ निवडणूकीच्या कामात प्रशासकीय यंत्रणा गुंतल्यानेही पाणीटंचाईच्या मुद्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. परिणामी, सर्वच तालुक्यांमधील टंचाईग्रस्त गावांमधील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट व्हायला लागली. ही बाब ‘लोकमत’ने ८ ते १२ एप्रिलदरम्यान प्रकाशित केलेली पाच भागांची वृत्तमालिका आणि १४ एप्रिलच्या अंकात ‘खैरखेड्यात पेटली पाणीटंचाई!’, या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या वृत्तामधून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्याची तडकाफडकी दखल घेत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावरून सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांची यादी तत्काळ सादर करण्याचे फर्मान सोडले आहे. तसेच विहिर अधिग्रहण, टँकर, नळयोजना दुरूस्ती यासह अन्य उपाययोजना विनाविलंब राबविण्यात याव्या, अशाही सूचना देण्यात आल्या असून अनेक उपाययोजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस गती देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील गावांमध्ये उद्भवणाºया पाणीटंचाईवर प्रभावीरित्या मात करण्यासाठी ४ कोटी ५९ लाख ९४ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या उपाययोजनांची चोख अंमलबजावणी केली जात आहे. तालुकास्तरावरून तहसीलदारांमार्फत पाणीटंचाई निवारणार्थ विहिर अधिग्रहण, तात्पुरती नळ योजना योजना, टँकरने पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजनांचे प्रस्ताव प्राप्त होताच तत्काळ अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुषंगाने २७ गावांमध्ये ३५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून टँकरही सुरू झाले आहेत.- ह्रषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदwater scarcityपाणी टंचाई