शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
3
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
4
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
5
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
6
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
7
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
8
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
9
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
10
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
11
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
12
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
13
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
14
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
15
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
16
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
17
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
18
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
19
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
20
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल

'सीमेवरील शहीद जवान सुनील धोपेंसोबत घातपात, फोन करुन वर्तवला होता धोका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 20:32 IST

कुटुंबीयांचा आरोप: सुनील धोपे यांनी फोन करून वर्तविला होता धोका

कारंजा लाड (वाशिम) : मेघालय राज्यातील सिलाँग येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत कारंजा येथील रहिवासी जवान सुनील विठ्ठलराव धोपे (३७) यांचा मृत्यू नसून, घातपातच असल्याचा आरोप धोपे कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत १६ सप्टेंबर रोजी कारंजा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहे.

कर्तव्याच्या ठिकाणी कार्यरत असताना सुनील धोपे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सहकाऱ्यांना १५ सप्टेंबर रोजी आढळून आले होते. उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती १५ सप्टेंबर रोजी बीएसएफ कॅम्पकडून धोपे कुटुंबीयांना देण्यात आली होती. दरम्यान, १७ सप्टेंबर रोजी त्यांचे पार्थिव कारंजा येथे आणले जाणार असून, अंतिम दर्शनानंतर शासकीस इतमामात अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती कारंजाचे ठाणेदार राजेंद्र बोडखे यांनी दिली. गत १९ वर्षांपासून ते सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व भाऊ असा आप्त परिवार आहे. १६ सप्टेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासह आम आदमी पार्टीचे यवतमाळ संघटक वसंत ढोके, तहसीलदार आर.बी. भोसले, जि. प. सदस्य गजानन अमदाबादकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत धोपे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

सुनील धोपे यांचा मृत्यू नसून, हा घातपातच असल्याचा आरोप धोपे कुटुंबीयांनी केला. सुनील धोपे यांनी १४ सप्टेंबर रोजी फोन करून आपण तणावात असून, वरिष्ठांसह सहकाºयांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली होती. या फोन रेकॉर्डिंगच्या आधारे सुनील यांचा भाऊ ज्ञानेश्वर धोपे यांनी याप्रकरणी सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाºयांविरुद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशनला १६ सप्टेंबर रोजी तक्रार देत सविस्तर चौकशीची मागणी केली. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, मनसेचे पदाधिकारी अमोल लुलेकर यांच्यासह शेकडो जणांची पोलीस स्टेशनमध्ये गर्दी झाली होती.मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आश्वासन१६ सप्टेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासह मान्यवरांनी धोपे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी पाटणी यांनी जवान धोपे यांच्या भावाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून बोलणे करून दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा प्रकार गंभीर असून, याची निश्चितपणे उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे आश्वासन धोपे कुटुंबीयांना दिले.बॉक्स.. 

१७ सप्टेंबरला कारंजा बंदजवान सुनील धोपे यांचा मृत्यू नसून, घातपात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केल्यानंतर याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होण्याकरिता सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्षांच्यावतीने १७ सप्टेंबर रोजी कारंजा बंदचे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :MartyrशहीदSoldierसैनिकwashimवाशिम