शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांमधील ओट्यांवर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचा माल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:24 IST

वाशिम : जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा शेतमाल ठेवला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा शेतमाल ठेवला जात आहे. परिणामी, ओट्याखाली शेतकºयांच्या शेतमालाची हर्रासी करताना शेतमालाची नासाडी होते. ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटवा, अशी मागणी वारंवार करण्यात आलेली असतानाही अद्याप यावर कुठलीच कार्यवाही न झाल्याने शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.जिल्ह्यात वाशिम, रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर व मालेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समित्या असून, त्याअंतर्गत जवळपास १० ठिकाणी उपबाजार समित्या आहेत. प्रत्येक बाजार समितीत शेतमालाची हर्रासी करण्यासाठी तसेच शेतकºयांचा शेतमाल ठेवण्यासाठी ओट्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र, या ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचाच शेतमाल ठेवला जात असल्याने ओट्याखाली शेतकºयांचा शेतमाल ठेवण्याची वेळ आली आहे. ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविण्यात यावा, या मागणीसाठी शेतकºयांसह संचालकांनीदेखील यापूर्वी आंदोलन केले होते. त्याची दखल घेत बाजार समिती प्रशासनाने व्यापाºयांचा शेतमाल हटविला होता. आता पुन्हा ओट्यांवर व्यापाºयांचाच शेतमाल ठेवला जात आहे. याविरोधात रिसोड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयराव गाडे, घनश्याम मापारी यांनी आवाज उठविला आहे. ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल न हटविल्यास ठिय्या आंदोलनाचा इशाराही दिला आहे. हीच परिस्थित अन्य बाजार समितीतही असल्याने ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी व संचालक पुढे येत आहेत. ...तर टाळता येईल नासाडीओट्यांवर व्यापाºयांचा शेतमाल असल्याने ओट्याखाली शेतकºयांचा शेतमाल ठेवून तेथे हर्रासी केली जाते. ओट्याखाली शेतमाल टाकताना दोन ते तीन किलोदरम्यान शेतमालाची नासाडी होते. याचा आर्थिक फटका शेतकºयांना बसत आहे. ओट्यावर हर्रासी झाली तर शेतमालाची नासाडी होणार नाही. अवकाळी पाऊस आला तर ओट्याखालील शेतमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते, याचा अनुभव यापूर्वी शेतकºयांना आला आहे. त्यामुळे ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविणे आवश्यक ठरत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकºयांचा शेतमाल ठेवण्यासाठी ओट्यांची व्यवस्था केली जाते. या ओट्यांवर शेतकºयांचा शेतमाल ठेवणे आवश्यक आहे. या ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा शेतमाल ठेवला जात असेल तर याप्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेना दिल्या जातील. व्यापाºयांनीदेखील ओट्यावर शेतमाल ठेवू नये.रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम

 ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविण्यासंदर्भात रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन संचालकांचे निवेदन प्राप्त झाले आहे. ओट्यावर व्यापाºयांचा शेतमाल राहत असल्याने शेतकºयांची गैरसोय होते, असा या निवेदनाचा आशय आहे. या विषयावर चर्चा झाली असून, लवकरच यशस्वी तोडगा काढण्यात येईल. शेतकºयांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.- विजय देशमुख, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोड

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिमFarmerशेतकरी