लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी वाशिम जिल्ह्यात आंदोलनाचा अक्षरशः भडका उडाला असून कालच्या मुंडण आंदोलनानंतर सोमवारी वाशिममधून गेलेल्या महामार्गावर मराठा समाजबांधवांनी चक्का जाम आंदोलन केले. यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही सुरू आहे.वाशिम-अकोला महामार्गावर सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास समाजबांधव रास्ता रोको करायला बसले. यावेळी आरक्षण देण्यास शासनाकडुन दिरंगाई होत असल्याचा मुद्दा समोर करून आंदोलकांनी शासनविरोधी घोषणा दिल्या. या आंदोलनामुळे दोन्ही बाजूची वाहतूक तासभर खोळंबली होती. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता.
Maratha Reservation: वाशिम-अकोला महामार्गावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 16:46 IST