लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. मात्र, शासनाने त्याची ठोस दखल अद्याप घेतली नाही. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय ३ आॅगस्टला पार पडलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार, ४ आॅगस्ट रोजी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, अंगणवाडी सेविकांनी देखील आंदोलनस्थळी हजेरी लावून आंदोलनास पाठिंबा दर्शविला.वाशिम तालुक्यात सर्कलनिहाय ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या तालुका समन्वयकांनी देखील त्या-त्या तालुक्यांमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचेही नियोजन पूर्ण झाले आहे. दरम्यान, सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने मराठा आरक्षणासाठी ४ आॅगस्ट रोजी रिसोड येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. यासह वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्याठिकाणी अंगणवाडी सेविकांनी हजेरी लावून मराठा समाजबांधवांच्या आंदोलनास लेखी पत्राव्दारे जाहीर पाठिंबा दर्शविला.
Maratha Reservation Protest: वाशिममध्ये ठिय्या आंदोलन; अंगणवाडी सेविकांचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 18:02 IST
मराठा समाजबांधवांनी ४ आॅगस्ट रोजी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन केले.
Maratha Reservation Protest: वाशिममध्ये ठिय्या आंदोलन; अंगणवाडी सेविकांचा पाठिंबा
ठळक मुद्देअंगणवाडी सेविकांनी देखील आंदोलनस्थळी हजेरी लावून आंदोलनास पाठिंबा दर्शविला.तालुक्यांमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचेही नियोजन पूर्ण झाले आहे.