लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मराठा समाजास आरक्षण देण्याचा ठोस निर्णय घेण्यासंदर्भात शासनस्तरावरून प्रचंड विलंब होत आहे. तसेच या मागणीकरिता सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवार, २३ जुलै रोजी काकासाहेब शिंदे या तरूणाचा नाहक बळी गेल्याने संतप्त झालेल्या मराठा समाजाने ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला. त्यानुषंगाने वाशिम जिल्ह्यातही मंगळवार, २४ जुलै रोजी विविध ठिकाणी समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध करून नंतर त्यांची सुटका केली. मंगळवारी दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले.मराठा आरक्षणासाठी कानडगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने सोमवारी नदीत उडी घेतली. खोलवर बुडाल्याने या घटनेत त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्राणास मुकलेल्या काकासाहेब शिंदे या तरूणास शहीद घोषित करावे, त्याच्या कुटूंबास ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, कुटूंबातील किमान एका व्यक्तीस शासकीय नोकरीस सामावून घ्यावे. यासह प्रलंबित आरक्षणाचा मुद्दा तत्काळ निकाली काढावा, आदी मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या.
Maratha Kranti Morcha : वाशिम जिल्ह्यात मराठा समाजाचा मोर्चा, आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 13:15 IST
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मराठा समाजास आरक्षण देण्याचा ठोस निर्णय घेण्यासंदर्भात शासनस्तरावरून प्रचंड विलंब होत आहे. तसेच या मागणीकरिता सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवार, २३ जुलै रोजी काकासाहेब शिंदे या तरूणाचा नाहक बळी गेल्याने संतप्त झालेल्या मराठा समाजाने ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला. त्यानुषंगाने वाशिम जिल्ह्यातही मंगळवार, २४ जुलै रोजी विविध ठिकाणी समाजाने ...
Maratha Kranti Morcha : वाशिम जिल्ह्यात मराठा समाजाचा मोर्चा, आंदोलन!
ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातही मंगळवार, २४ जुलै रोजी विविध ठिकाणी समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मंगळवारी दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले.प्रलंबित आरक्षणाचा मुद्दा तत्काळ निकाली काढावा, आदी मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या.