तालुका कृषी अधिकारी पद रिक्त असून मंडळ अधिकारी किशोर सोनटक्के यांचेकडे प्रभार आहे. कृषि सहायकाची २४ मंजूर पदे असताना १३ पदे असून ९ पदे रिक्त आहेत. इंझोरी,भूली, गव्हा, कारपा, पाळोदी, रुई, फूलउमरी, उमरी खुर्द, वाईगौळ ह्या नऊ मुख्यालय गावी कृषि सहायक नाही. इतर कृषि सहायक यांचेकडे या मुख्यालयी गावातील प्रभार आहे. कृषि विभागाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थीच्या जमिनीवर फळबाग लागवड योजना, यांत्रिकीकरण, स्प्रिंकलर, मोफत बियाने वाटप,माती परीक्षण,अतिवृष्टीचे पंचनामे, शेतकरी मार्गदर्शन आदी कामे रिक्त पदामुळे प्रभावित झाली आहेत.
याकडे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रितिनिधी यांनी लक्ष देऊन रिक्त पदे भरावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून तालुका कृषि अधिकारी कार्यालयात पदे रिक्त आहेत. आवश्यक मनुष्यबळ असले तर काम करणे सोपे होते. रिक्त पदाचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला कळविला आहे.
- किशोर सोनटक्के़
-------------
गुणवंत विद्यार्थी मेळावा
मानाेरा : वर्ग १० व १२ वी मधे गुणानुक्रमे अव्वल आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मेळावा दिनांक ८ सप्टेंबर रोजी मासुपा महाविद्यालय मानोरा येथे घेण्यात आला. यामधे ४४ गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले होते. प्रमुख अतिथी म्हणून धनजचे ठाणेदार अनिल ठाकरे, संस्था सचिव महादेव ठाकरे, मोतीराम ठाकरे, ज्ञानदेव भोयर, प्रा.डॉ. एन. ए.ठाकरे यांची उपस्थिती होती. तालुक्यातील विविध शाळांमधून अव्वल आलेल्या ४४ विद्यार्थी यांचा मान्यवरांनी प्रमाणपत्र मोमेंटो देऊन सत्कार केला. या वेळी पोलिस निरीक्षक अनिल ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय विभागप्रमुख प्रा. डॉ. एन. ए. ठाकरे यांनी केले. संचालन प्रा. हेमंत देशमुख यांनी केले तर प्रा. डॉ. अख्तर अली यांनी आभार मानले.
प्रभारी तालुका कृषी अधिकारी, मानाेरा