लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : तालुक्यातील वनोजा येथील राऊत यांच्या शेतात असलेल्या शेततळ्यातील पाण्यात बुडून महंमद फैजान शे. नासीर (रा. पथ्रोट, जि. अमरावती) या १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना १८ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.मृतकाचा चुलत भाऊ शे. इजाज शे. रफीक याने मंगरूळपीर पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की संत्रा तोडण्याकरिता ते आणि महंमद फैजान वनोजा येथे आले होते. दरम्यान, फैजान हा रविवारी सकाळी शौचास जाण्याच्या निमित्ताने बाहेर पडला. मात्र, उशिरापर्यंत न परतल्यामुळे त्याचा शोध घेतला असता, त्याचा मृतदेह शेततळ्यातील पाण्यात आढळून आला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह शोधण्याकामी पिंजर येथील गाडगेबाबा आपत्कालिन संस्थेच्या पथकाने योगदान दिले.
मंगरूळपीर : वनोजा येथे शेततळ्यातील पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 20:26 IST
मंगरूळपीर : तालुक्यातील वनोजा येथील राऊत यांच्या शेतात असलेल्या शेततळ्यातील पाण्यात बुडून महंमद फैजान शे. नासीर (रा. पथ्रोट, जि.अमरावती) या १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना १८ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मंगरूळपीर : वनोजा येथे शेततळ्यातील पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू!
ठळक मुद्देमृतक महंमद फैजान शे. नासीर हा अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट येथील रहिवासी