कारंजा लाड (वाशिम) : हळदी-कुंकवासाठी निघालेल्या महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र आणि सोनसाखळी मिळून दोन लाख रुपयांचे दागिने अज्ञात दुचाकीस्वारान पळवल्याची घटना १८ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास येथे घडली. कारंजा शहरातील जागृतीनगरात राहणारी अर्चना विठ्ठलराव गावंडे ही महिला परिसरात हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला जात असताना दुचाकीवर आलेल्या एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळय़ातील ४८ गॅ्रम वजन असलेला १ लाख ४0 हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच २२ ग्रॅम वजनाची ६७ हजार २९४ रुपये किमतीची सोनसाखळी तोडून पोबारा केला. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कारंजा शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांनी भादंविच्या कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल केला.
मंगळसूत्र पळविले
By admin | Updated: January 19, 2015 02:22 IST