लोकमत न्यूज नेटवर्कअमानी (वाशिम ) - मालेगाव-वाशिम मार्गावरील अमानीनजीक झालेल्या दुचाकी अपघातात अमानी येथील रहिवासी तथा उत्तराखंड येथे सशस्त्र सीमा दलामध्ये कार्यरत जवान अनिल रामकृष्ण शेळके (२५) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २८ नोव्हेंबरच्या रात्रीदरम्यान घडली. त्याच्यासोबत दुचाकीवर असलेले पुंडलिक श्रीपाद झळके (२५) व किशोर सखाराम झळके (२५) हे दोघेही जखमी झाले. मृतक अनिल शेळके हा तीन दिवसांपासून सुट्टीवर गावी आला होता. २८ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास एमएच २०, डीडब्ल्यू ३३०६ क्रमांकाच्या दुचाकीने तो दोन मित्रासमवेत मालेगाववरून अमानीला येत होता. दरम्यान अमानीनजीक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी लिंबाच्या झाडाला आदळून रस्त्यालगतच्या खड्डयात पडली. यामध्ये अनिल शेळके हा जागीच ठार तर अन्य दोन जण जखमी झाले. जमखीवर वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुट्टीवर गावी आलेल्या अमानी येथील या जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मालेगाव-वाशिम मार्गावर दुचाकी अपघातात जवान ठार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 18:20 IST
मालेगाव-वाशिम मार्गावरील अमानीनजीक झालेल्या दुचाकी अपघातात अमानी येथील रहिवासी तथा उत्तराखंड येथे सशस्त्र सीमा दलामध्ये कार्यरत जवान अनिल रामकृष्ण शेळके (२५) याचा जागीच मृत्यू झाला.
मालेगाव-वाशिम मार्गावर दुचाकी अपघातात जवान ठार!
ठळक मुद्देमृत पावलेला जवान अनिल रामकृष्ण शेळके अमानी येथील रहिवासीउत्तराखंडात सशस्त्र सीमा दलात होते कार्यरत