शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव ‘टीएचओ’ हाजीर हो..! फोटो व्हायरल झाल्यानंतर चौकशीसाठी बोलावले

By संतोष वानखडे | Updated: June 25, 2023 17:55 IST

या प्रकरणात मालेगाव टीएचओंना उद्या सोमवारी बोलावण्यात आल्याचे सांगितले.

वाशिम : कार्यालयीन वेळेत मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी (टीएचओ) हे टेबलावर पाय ठेवून सर्वसामान्य जनता, राजकीय पदाधिकाऱ्यांशी बोलतानाचे छायाचित्र वंचित बहुजन आघाडी युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष अनिल गरकळ यांनी सोशल मीडियावर व्हायरल करून याकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. याची दखल घेत मालेगाव टीएचओंना सोमवार, २६ जून रोजी जिल्हा परिषदेत बोलाविण्यात आले.

वंचित बहुजन आघाडी युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य पूत्र अनिल गरकळ यांच्या तक्रारीनुसार, गरकळ हे २३ जून रोजी मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात गेले होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष बोरसे हे टेबलावर पाय ठेवून समोरच्यांशी बोलत होते. गरकळ यांनी या घटनेचे छायाचित्र काढून व्हाट्स ॲप स्टेट्सवर ठेवले तसेच फेसबुकवरही पोस्ट व्हायरल केली. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनता, राजकीय पदाधिकाऱ्यांशी नेमके कशा पद्धतीने बोलावे याचे भान ठेवायला हवे, मात्र मालेगाव टीएचओंनी गैरवर्तणूक केल्याने त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी अनिल गरकळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. यासंदर्भात जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य विषय समितीचे सभापती चक्रधर गोटे यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणात मालेगाव टीएचओंना उद्या सोमवारी बोलावण्यात आल्याचे सांगितले.

मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात कामानिमित्त गेलो असतो तेथे टीएचओ डाॅ. संतोष बोरसे हे टेबलवर पाय ठेवून समोरच्यांशी बोलत असल्याचे दिसून आले. ही बाब अशोभनीय असून, याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे सीईओंनी आश्वासन दिले. - अनिल गरकळ, तक्रारकर्ते तथा जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी युवा शाखा अनिल गरकळ आणि माझा कुठला काही संवाद नाही. या प्रकरणात मला काही बोलायचे नाही. - डाॅ. संतोष बोरसे, तालुका आरोग्य अधिकारी, मालेगाव 

टॅग्स :washimवाशिमVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी