शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
5
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
6
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
7
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
8
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
9
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
10
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
11
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
12
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
13
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
14
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
15
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
16
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
17
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
18
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
19
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधा-यांनीच ठोकले मालेगाव नगर पंचायतला कुलूप

By admin | Updated: May 24, 2016 02:00 IST

कायमस्वरूपी मुख्याधिका-यांचे पद रिक्त असल्यामुळे कामे खोळंबली.

मालेगाव (जि. वाशिम): कायमस्वरूपी मुख्याधिकार्‍यांअभावी शहरवासीयांची कामे खोळंबली आहेत. शहरातील विकासात्मक कामांना चालना मिळण्यासाठी मालेगाव नगर पंचायतला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याच्या मागणीसाठी सत्ताधार्‍यांसह नगरसेवकांनी २३ मे रोजी नगर पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
मालेगाव नगरपंचायत अस्तित्वात येऊन चार महिन्यांचा अवधी झाला आहे. अद्याप कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाला नाही. त्यामुळे जनतेची कामे ठप्प झाली आहेत. शहरात भीषण पाणीटंचाईची समस्या असूनदेखील पाणी टँकर मंजूर नाही. नगर पंचायतला तीन महिन्यांमध्ये तीन प्रभारी मुख्याधिकारी लाभले आहेत. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शहर विकासाची अनेक कामे ठप्प पडली आहेत. शहरातील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असून, कर्मचारीसुद्धा याचा गैरफायदा घेऊन कर्तव्यात कसूर करताना दिसत आहेत. प्रभारी मुख्याधिकारीे आठवड्यातील एक किंवा दोन दिवसच येत असल्याने अनेकांचे मालमत्ता कार्डबाबतचे दाखले, इतर कामे ठप्प झाले आहेत. शहरात तीव्र पाणीटंचाई असताना टंचाई नसल्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविल्याने याबाबत कोणत्याही प्रकारची मदत नगर पंचायतला मिळत नाही. शहरवासीयांपर्यंत पाणी पोहोचविण्याचे काम काही वार्डातील नगरसेवक स्वखर्चातून करीत आहेत. एवढे असूनसुद्धा जिल्हा प्रशासन नगर पंचायतींच्या अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पदाधिकार्‍यांनी केला. सत्ताधारी नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांना २0 मे रोजी पत्र पाठवून २३ मेपर्यंत कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी केली. मुख्याधिकारी मिळाले नसल्याने २३ मे रोजी कुलूप ठोकून ठोकून लोकशाही मार्गाने आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी नगराध्यक्ष मीनाक्षी बाळा सावंत, गोपाल मानधने, बबनराव चोपडे, सबनुरबी सत्तार, रूपाली शशी टनमने, रेखा अरुण बळी, शीतल खुळे, गजानन सारस्कर, अफसानाबी तसलीम आदी नगर सेवक उपस्थित होते.