शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
2
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
3
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
4
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
5
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
6
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
7
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
8
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
9
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
10
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
11
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
12
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
13
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
15
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
16
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
17
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
18
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
19
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
20
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?

Maharashtra Election 2019 : २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 18:05 IST

अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्हयातील काही मतदारसंघामधील मतदानामध्ये घट आल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.

- नंदकिशोर नारे

वाशिम: २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदान व २१ आॅक्टोबर २०१९ रोजी झालेले मतदानाच्या टक्केवारी पाहता पश्चिम वºहाडातील अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्हयातील काही मतदारसंघामधील मतदानामध्ये घट आल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. यामध्ये वाशिम जिल्हयातील तीन पैकी एक, बुलडाणा जिल्हयातील ७ मतदारसंघापैकी ५ तर अकोला विधानसभा मतदारसंघातील ५ पैकी २ मतदारसंघातील निवडणुकीतील मतदान घटले आहे.पश्चिम वºहाडातील अकोला जिल्हयात एकूण ५ मतदारसंघाचा समावेश आहे. यामधील बाळापूर, अकोला पूर्व व मुर्तिजापूर वगळता अकोट मतदारसंघ व अकोला पश्चिम मतदारसंघाच्या निवडणुकीत घट दिसून येत आहे. अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या निवडणुकीत ६०.८१ टक्के मतदान झाले होते . २०१९ च्या निवडणुकीत ६०.५० टक्के मतदान झाल्याने या मतदारसंघात ०.३१ टक्के मतदानात घट झाली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघामध्ये गत निवडणुकीत ५१.६२ टक्के मतदान झाले होते परंतु यावेळी ५०.२० टक्के मतदान झाल्याने यामध्ये १.४२ टक्के घट दिसून येत आहे.बुलडाणा जिल्हयातील ७ विधानसभा मतदारसंघापैकी तब्बल ५ मतदारसंघामधील मतदानाच्या टक्केवारीत घट दिसून येत आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघात गत निवडणुकीत ६६.३६ टक्के तर यावर्षीच्या निवडणुकीत ६५.२० टक्के मतदान झाले. या मतदारसंघात १.१६ टक्के मतदान घटले. बुलडाणा मतदारसंघामध्ये गत निवडणुकीत ५९.७९ टक्के तर यावेळच्या निवडणुकीत ५८.२० टक्के मतदान झाल्याने या मतदारसंघात १.५९ मतदान घटले. चिखली मतदारसंघात गतनिवडणुकीत ६७.६६ टक्के तर यावेळीच्या निवडणुकीत ६४.६२ टक्के मतदान होवून गत निवडणुकीच्या तुलनेत ३.०४ टक्के मतदानात घट झाली आहे. सिंदखेड राजा मतदारसंघात गत निवडणुकीत ६४.६७ टक्के तर यावेळीच्या निवडणुकीत ६३.८७ टक्के मतदान होवून या मतदारसंघामध्ये ०.८ टक्के मतदान घटले. खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गत निवडणुकीत ७३.८६ टक्के तर यावेळी ७०.१० टक्के मतदान झाले असून या मतदारसंघामध्ये ३.७६ टक्के मतदान घटल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरुन दिसून येते. बुलढाणा जिल्हयातील मेहकर व जळगाव जामोद मतदारसंघामधील निवडणुकीत घट झालेली दिसून येत नसली तरी फार मोठी अशी वाढ सुध्दा दिसून येत नाही.वाशिम जिल्हयातील तीन विधानसभा मतदारसंघातील केवळ कारंजा या मतदारसंघात २.१७ टक्के मतदान गत निवडणुकीच्या तुलनेत कमी झालेले दिसून येत आहे. कारंजा मतदारसंघामध्ये गत निवडणुकीत ६३.२४ तर यावेळीच्या निवडणुकीत ६१.०७ टक्के मतदान झाले. रिसोड व वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र अनुक्रमे १.०६ व १.८३ टक्के मतदानात वाढ दिसून येत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019akola-east-acअकोला पूर्वakola-west-acअकोला पश्चिमbuldhana-acबुलडाणाwashim-acवाशिमVotingमतदानElectionनिवडणूक