शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाबीज करणार शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 10:53 IST

संबंधित शेतकºयाने महाबीजच्या प्रमाणित वाणांची पेरणी केली असणे आवश्यक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षी अवकाळी पावसामुळे काढणीवर आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे राज्यात या पिकाचे अपेक्षीत प्रमाणात बियाणे उपलब्ध झाले नाही. याच बियाण्यांचा संभाव्य तुटवडा दूर करण्यासाठी महाबीज त्यांचे सोयाबीन खरेदी करणार आहे. महाबीजसाठी बिजोत्पादन करणारे शेतकऱ्यांशिवाय इतरही शेतकºयांकडून हे सोयाबीन घेतले जाणार आहे; परंतु संबंधित शेतकºयाने महाबीजच्या प्रमाणित वाणांची पेरणी केली असणे आवश्यक आहे.गतवर्षीच्या हंगामात बहुतांश शेतकºयांचे सोयाबीन काढणीवर आले असताना आणि अनेकांनी सोयाबीन काढून सुड्या लावून ठेवल्या असताना अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे काढून ठेवलेल्या सोयाबीनसह काढणीवर आलेल्या आणि शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसून, या पिकाचा दर्जा खालावला. परिणामी, या पिकातून अपेक्षीत प्रमाणात लागवडी योग्य बियाण्यांची निर्मिती होऊ शकली नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीनच्या वाणाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषी सचिवांनी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडे (महाबीज) महाबीजच्या वाणाची पेरणी केलेल्या शेतकºयांकडून सोयाबीन खरेदी करून बियाण्यांचा तुटवडा दूर करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याला महाबीजच्या व्यवस्थापकांनी मान्यता दिली. त्यानुसार आता ज्या शेतकºयांनी गतवेळच्या खरीप हंगामात महाबीजच्या प्रमाणीत सोयाबीन वाणांची पेरणी केली आहे. त्या शेतकºयांकडून सोयाबीन विकत घेण्याची तयारी सुरू केली आहे. महाबीजमार्फत सत्यप्रत वाण म्हणून हे सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे.उगवणशक्ती चाचणी करूनच खरेदीमहाबीजच्या प्रमाणीत वाणांची पेरणी केलेल्या शेतकºयांकडून उत्पादीत सोयाबीन महाबीजमार्फत खरेदी केले जाणार असले तरी शेतकºयांनी उत्पादीत केलेल्या सोयाबीनची उगवणशक्ती किमान ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असेल, तेच खरेदी केले जाणार आहे. यासाठी सदर शेतकºयांच्या सोयाबीनची खरेदी करण्यापूर्वी त्याची उगवणशक्ती तपासली जाणार आहे.हमी दरापेक्षा १० टक्के अधिक दरमहाबीजच्या उपक्रमांतर्गत ज्या शेतकºयांकडून सोयाबीन खरेदी केले जाणार आहे. त्या शेतकºयांना सद्यस्थितीत असलेल्या केंद्रशासनाकडून जाहीर हमीदरापेक्षा १० टक्के अधिक दराने मोबदला दिला जाणार आहे. यासाठी महाबीजकडे अनेक शेतकºयांनी आपल्या सोयाबीन बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी आणून दिले आहेत.

 

टॅग्स :washimवाशिमMahabeejमहाबीजFarmerशेतकरी