शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘लूडो गेम’चा वापर आता जुगारासारखा; पोलिसांच्या डोळ्यांत धुळफेक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 14:22 IST

वाशिम: स्मार्टच्या फोनच्या गैरवापराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, या फोनवर नवनवे गेम डाऊनलोड करून त्याचा जुगाराच्या खेळासारखा वापर केला जात असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देसुरुवातीच्या काळात मनोरंजन म्हणून खेळला जाणारा या गेमचा वापर आता जुगारासारखा होत आहे. एकाचवेळी चार जण या खेळात सहभागी होतात आणि हजारो रुपयांचा जुगार या गेमद्वारे खेळला जातो.पोलिसांच्या डोळ्यांत धुळफेक करून हा प्रकार सुरू असल्याचे लोकमतकडून शुक्रवारी करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: स्मार्टच्या फोनच्या गैरवापराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, या फोनवर नवनवे गेम डाऊनलोड करून त्याचा जुगाराच्या खेळासारखा वापर केला जात असल्याचे दिसत आहे. यामध्ये चौसर या  खेळाच्या धर्तीवर तयार झालेल्या लूडो’ या गेमचा मोठ्या प्रमाणात जुगारासारखा वापर ग्रामीण भागांत सुरू आहे. पोलिसांच्या डोळ्यांत धुळफेक करून हा प्रकार सुरू असल्याचे लोकमतकडून शुक्रवारी करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाले आहे. स्मार्ट फोनचा वापर अलिकडच्या काळात सर्वसाधारण झाला असून, या फोनच्या वापराचे तंत्र अगदी अल्पशिक्षीतांनाही अवगत झाले आहे. तथापि, संपर्क साधण्यासह इतर माहिती तात्काळ पाठवून हजारो किलोमीटरवरून प्रत्यक्ष संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम असलेल्या या फोनचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अश्लील चित्रफिती व्हायरल करतानाच या फोनमध्ये विविध प्रकारचे गेम डाऊनलोड करणे आणि त्याचा जुगारासारखा वापर करण्याचे प्रकारही आता वाढू लागले आहेत. गेल्या वर्षभरापासून या फोनवर लूडो गेमचा वापर अधिक वाढला आहे. सुरुवातीच्या काळात मनोरंजन म्हणून खेळला जाणारा या गेमचा वापर आता जुगारासारखा होत आहे. एकाचवेळी चार जण या खेळात सहभागी होतात आणि हजारो रुपयांचा जुगार या गेमद्वारे खेळला जातो. यातील वास्तव पडताळण्यासाठी लोकमतच्यावतीने ग्रामीण भागांत स्टिंग आॅपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने युवक मंडळी या गेमवर मोठ्या प्रमाणात पैसे लावत असल्याचे दिसून आले. पोलिसांच्या डोळ्यांत धुळफेक करून गुप्तपणे हा खेळ सुरू आहे.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिसentertainmentकरमणूक