शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील २५ प्रकल्पांनी तळ गाठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 16:54 IST

वाशिम: हिवाळा अद्याप संपला नसतानाच जिल्ह्यातील २५ प्रकल्पांनी तळ गाठला असून, ११ प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उरला आहे, तर उर्वरित प्रकल्पांची स्थितीही गंभीर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: हिवाळा अद्याप संपला नसतानाच जिल्ह्यातील २५ प्रकल्पांनी तळ गाठला असून, ११ प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उरला आहे, तर उर्वरित प्रकल्पांची स्थितीही गंभीर होत आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पांवर आधारीत भागांत पाणीटंचाईचे सावट दाट झाल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात ३ मध्यम आणि १३१ लघू पाटबंधारे व बॅरेजेस मिळून एकूण १३४ प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांत मिळून सद्यस्थितीत ३४ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उरला आहे, त्यातील तीनपैकी दोन मध्यम प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. उर्वरित १३१ प्रकल्पांचा विचार करता ३० टक्क्यांहून कमी उपयुक्त साठा उरला असून, यातील बहुतांश प्रकल्पांवर सिंचन आणि पाणी पुरवठा योजनाही राबविल्या जात आहेत. जिल्ह्यातील रब्बी क्षेत्र यंदा वाढल्याने सिंचनासाठी पाण्याचा उपसाही वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदाही पाणीटंचाईची समस्या जाणवणार असल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत वाशिम तालुक्यातील ९, रिसोड तालुक्यातील ८, मंगरुळपीर तालुक्यातील ३, तर मालेगाव, मानोरा आणि कारंजा तालुक्यातील प्रत्येकी दोन प्रकल्पांनी तळ गाठला आहे. यातील बहुतांश प्रकल्प सिंचनासाठी असल्याने शेतकºयांना सिंचनात अडचणी निर्माण झाल्या आहेत, तर पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणाºया प्रकल्पांची स्थिती गंभीर होत असल्याने जिल्हावासियांना प्रामुख्याने ग्रामीण भागांतील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमDamधरण