शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बंदमुळे कारंजा आगाराचे दोन लाखाचे नुकसान; अकोला-यवतमाळ बसच्या काचा फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 17:42 IST

बंदमुळे कारंजा आगाराच्या लांब पल्ल्याच्या ३० फेºया रद्द झाल्याने जवळपास २ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक नावकर यांनी दिली.

ठळक मुद्देबसच्या काचा फोडल्यामुळे कारंजा आगारातून जाणाºया लांब पल्ल्याच्या तसेच इतरही 30 बसफेºया रद्द करण्यात आल्या.मुर्तिजापूर आगाराच्या एम एच १४ बी.टी. ४९८४ क्रमांकाच्या बसच्या काचा फोडल्याने या घटनेत एक चिमुकला जखमी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड - मराठा आरक्षण यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने २५ जुलै रोजी कारंजा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमुळे कारंजा आगाराच्या लांब पल्ल्याच्या ३० फेºया रद्द झाल्याने जवळपास २ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक नावकर यांनी दिली. बंददरम्यान मुर्तिजापूर आगाराच्या एम एच १४ बी.टी. ४९८४ क्रमांकाच्या बसच्या काचा फोडल्याने या घटनेत एक चिमुकला जखमी झाला. २५ जुलै रोजी दिवसभर कारंजा शहरातील प्रतिष्ठाणे बंद ठेवून व्यावसायिकांनी कारंजा बंदला व्यापक प्रतिसाद दिला. सकाळी काढलेल्या मोटार सायकल रॅलीत ‘हरहर महादेव व जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. रॅली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चैकात आल्यानंतर सकल मराठा बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, गाडगे महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान देणाºया काकासाहेब शिंदे यांना सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. बंददरम्यान कारंजा शहरातील शाळांनाही सुट्टी देण्यात आली. शिवाय एस टीही बंद असल्याने प्रवासी वाहतूक प्रभावित झाल्याचे दिसून आले. बंदमधून दवाखाने व मेडिकल वगळण्यात आले होते. दरम्यान बंदच्या काळात कारंजातील शकुंतलाबाई धाबेकर विद्यालयासमोर  मुर्तिजापूर आगाराच्या एम एच १४ बी.टी. ४९८४ क्रमांकाच्या बसच्या काचा फोडल्याने या घटनेत एक चिमुकला जखमी झाला. बसच्या काचा फोडल्यामुळे कारंजा आगारातून जाणाºया लांब पल्ल्याच्या तसेच इतरही 30 बसफेºया रद्द करण्यात आल्या. यामुळे कारंजा आगाराचे जवळपास २ लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाले. बसची काच फोडल्याने मूर्तिजापूर आगाराचे पाच हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती कारंजा आगार व्यवस्थापक नावकर यांनी दिली.बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच शहरात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने यांच्या मार्गदर्शनात कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार एम.एम. बोडखे यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाºयांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :KaranjaकारंजाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद