शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आठवी ते बारावीच्या शाळेच्या घंटेची प्रतीक्षा लांबली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 12:02 IST

Washim News : जिल्ह्यातील ९० हजारांवर विद्यार्थ्यांना शाळेच्या घंटेची प्रतीक्षा लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यातील कोरोनामुक्त भागात शाळा सुरू होणार आहे. या भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग उघडण्याचा शासनाचा विचार असून, कोरोनामुक्त भागांतील  शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि हा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती आहे.  असे असले  तरी वाशिम जिल्ह्यात कोरोनामुक्त ग्रामपंचायतींची माहिती संकलित करून शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या  असून, जिल्ह्यातील ९० हजारांवर विद्यार्थ्यांना शाळेच्या घंटेची प्रतीक्षा लागली आहे.महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णवाढीला ब्रेक लागला आहे. कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर आता राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे.  त्यामुळे   कोरोनाकाळात बंद असलेले शाळेचे दरवाजे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा उघडण्याची शक्यता निर्माण झाली होती.  राज्यातील कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेण्यातही आला होता. त्यात  शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबतचे सर्वाधिकार हे ग्रामपंचायतींना देण्याचे नमूद केले होते. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील ९० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या शाळा उघडण्याची  शक्यता निर्माण झाली होती. तथापि शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पाच जुलै रोजी या संदर्भात घेतलेल्या निर्णयाबाबत अधिकृत अशी सुचना जि. प. शिक्षण विभागाला मिळाली नाही. तरीही शिक्षण विभाग कोरोनामुक्त ग्रामपंचायतीच्या माहितीचे संकलन करीत असून, पुढील निर्णयाची प्रतिक्षा सर्वांना लागली आहे. तर एका बाकावर बसणार एकच विद्यार्थी शासन निर्णय अंतिम झाल्यास व   कोरोनामुक्त ग्रामपंचायतींनी ठराव घेतल्यानंतर ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू केल्यास या शाळांमध्ये कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे. शाळांमध्ये एका बाकावर केवळ एका विद्यार्थ्याला बसण्याची परवानगी असेल. तसेच दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवले जाईल. तसेच विद्यार्थ्यांना कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे लागणार आहे. 

आसन क्षमतेमुळे     वर्गाचे विभाजन कोरोनामुक्त गावांत ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू झाल्यास वर्गातील आसन क्षमता कमी करून फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे एका वर्गात विद्यार्थ्यांची संख्या ५० टक्क्यांहूनही कमी राहण्याची शक्यता असल्याने वर्गाचे विभाजन करावे लागणार असून शिक्षकांना एकाच वर्गासाठी एकाच विषयाच्या दोन किंवा त्यापेक्षा अधिक तासिका दरदिवशी घ्याव्या लागणार आहेत. 

कोरोनामुक्त भागांतील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय मागे घेतल्याची  माहिती आहे.  परंतु संभाव्य स्थितीचा विचार करुन जिल्ह्यातील कोरोनामुक्त ग्रामपंचायतींची माहिती संकलित करण्याचे काम आमच्या स्तरावर सुरू करण्यात आले असून, वरिष्ठस्तरावरुन सुचनेची प्रतिक्षा आहे-रमेश तांगडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा