शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'लोकमत' वृत्ताची दखल : मांडवा, बोरखेडी गावात पोहचले पाण्याचे टँकर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 16:37 IST

वृत्ताची दखल घेत तातडीने शुक्रवारी मांडवा आणि बोरखेडी येथे पाण्याचे टँकर पाठविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : टँकर मंजूर असूनही काही गावात पोहचले नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १६ मे रोजी प्रकाशित केल्यानंतर, प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत तातडीने शुक्रवारी मांडवा आणि बोरखेडी येथे पाण्याचे टँकर पाठविण्यात आले.यावर्षी रिसोड तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गतवर्षी रिसोड तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही. त्यामुळे जलप्रकल्पांत पुरेशा प्रमाणात जलसाठा नव्हता. ११ पेक्षा अधिक जलप्रकल्प कोरडेठण्ण पडल्याने पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढली आहे. पाणीपुरवठ्यासाठी टँकरची मागणी करणाºया करंजी गरड, मांडवा, बिबखेड व बोरखेडी अशा चार गावांत टँकर मंजूर आहेत. यापैकी करंजी गरड गावाचा अपवाद वगळता उर्वरीत गावात टँकर पोहचले नव्हते. वीजपुरवठा खंडीत असला तर करंजी गरड येथेही टँकर पोहचू शकत नाही. त्यामुळे करंजी गरड येथे टँकरच्या फेºया नियमित नसतात. गुरूवारी बिबखेडचा अपवाद वगळता बोरखेडी व मांडवा येथे टँकर पोहचले नव्हते. जलस्त्रोट आटले आणि पाण्याचे टँकरही नसल्याने गावकºयांचा घसा कोरडाच राहत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १७ मे रोजीच्या अंकात प्रकाशित केले. याची दखल घेत १७ मे रोजी सकाळी मांडवा येथे टँकर पोहचले तर बोरखेडी येथे दुपारी टँकर पोहचले. शुक्रवार, १७ मे रोजी मांडवा आणि बोरखेडी या दोन्ही गावात टँकर पोहचले, अशी माहिती रिसोड पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ सहायक आर.एल. गरकळ यांनी दिली. पाणीटँकर नियमित सुरू राहावे, अशी अपेक्षा गावकºयांनी व्यक्त केली.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाईRisodरिसोड