शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : पाळणाघरामुळे महिला मतदारांना आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 16:09 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दिव्यांग मतदारांना सुविधा उपलब्ध करतानाच या प्रक्रियेत रणरणत्या उन्हात उभे राहणाऱ्या मतदार मातांच्या चिमुकल्यांना पाळणाघराचा मोठा आधार झाला आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दिव्यांग मतदारांना सुविधा उपलब्ध करतानाच या प्रक्रियेत रणरणत्या उन्हात उभे राहणाऱ्या मतदार मातांच्या चिमुकल्यांना पाळणाघराचा मोठा आधार झाला आहे.मोहरी येथे या पाळणाघराचा आधार अनेक महिलांनी घेत मतदान केले.लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील ७ मतदारसंघात मतदान प्रक्रियेला ११ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली.

वाशिम - लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दिव्यांग मतदारांना सुविधा उपलब्ध करतानाच या प्रक्रियेत रणरणत्या उन्हात उभे राहणाऱ्या मतदार मातांच्या चिमुकल्यांना पाळणाघराचा मोठा आधार झाला आहे. मोहरी येथे या पाळणाघराचा आधार अनेक महिलांनी घेत मतदान केले. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास फायदा झाल्याचेही स्पष्ट होत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील ७ मतदारसंघात मतदान प्रक्रियेला ११ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. मतदानादरम्यान उन्हात ताटकळत उभे राहणाऱ्या मतदारांना त्रास होऊ नये, मतदान यादी पाहताना अडचणी येऊ नये म्हणून विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यात दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रॅम्प आदि सुविधा असतानाच महिला मतदारांच्या मुलांना सांभाळण्यासाठी पाळणाघराचीही सुविधा दिली. महिला मतदारांना या पाळणाघरात मुले ठेवून मतदान करणे सोपे झाले. या पाळणाघरात आशा सेविकांनी मुले सांभाळण्याची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे महिलांच्या मतांचा टक्का वाढण्यासही मदत झाल्याचे दिसून आले.

लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात आज मतदान होत आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागत आहेत. 

17 व्या लोकसभेसाठी भारतातील 29 राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात झाली असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwashimवाशिम