शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

Lok Sabha Election 2019 : वाशिम-यवतमाळ मतदारसंघात मातब्बरांचे राजकीय अस्तित्व पणाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 14:49 IST

वाशिम : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह प्रमुख पक्षांशी बंड करणाऱ्यांचे राजकीय अस्तित्वच सिद्ध करणारी ठरणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह प्रमुख पक्षांशी बंड करणाऱ्यांचे राजकीय अस्तित्वच सिद्ध करणारी ठरणार आहे. सलग चार वेळा लोकसभेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या भावना गवळी, काँग्रेसकडून प्रथमच लोकसभा उमेदवारी मिळविणारे माणिकराव ठाकरे यांच्यासह भाजपच्या राजकारणात मोठे स्थान असतानाही, बंड करून उमेदवारी दाखल करणारे पी. बी. आडे यांच्या केवळ विजयावरच त्यांचे राजकीय अस्तित्व अवलंबून राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट दिसत आहे. या मतदारसंघात चुरशीची लढत आहे.शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी १९९९ पासून लोकसभेत शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांनी १९९९ आणि २००४ या दोन निवडणुकीत वाशिम, तर त्यानंतर पुनरर्चनेत निर्माण झालेल्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात २००९ आणि २०१४ असा दोन वेळा विजय मिळविला. तथापि, सतत चारवेळा लोकसभेत खासदार म्हणून म्हणावा तेवढा विकास त्यांना साधता आला नसल्याची खंत मतदारांत व्यक्त होत असतानाच आता युतीच्या अंतर्गत गटबाजीनेही त्यांचे राजकीय अस्तित्व अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांचा विचार करता दोन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे नेतृत्व करण्याची एकप्रकारे दुर्मिळ संधी माणिकराव ठाकरे यांना मिळाली होती. आॅगस्ट २००८ मध्ये प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या ठाकरे यांनी या पदावर सहा वर्षे पूर्ण केली. राज्यात काँग्रेसचा सहा वर्षे एवढे दीर्घकाळ अध्यक्षपद भूषविणारे ठाकरे हे पहिलेच अध्यक्ष आहेत. १९९० च्या दशकात राज्य युवक काँग्रेसचे पाच वर्षे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. स्व.विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या तीन मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी काम केले आहे. गत लोकसभेच्या निवडणुकीत विद्यमान खासदार भावना गवळी यांना जोरदार लढत देणारे शिवाजीराव मोघे यांना डावलून काँग्रेसने माणिकरावांना उमेदवारी दिली. दारव्हा विधानसभेतील पराभवानंतरही पक्षासाठी केलेले कार्य लक्षात घेऊनच त्यांना ही संधी देण्यात आली आहे. तथापि, या संधीचा फायदा ते कसे उठवतात, यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. हीच स्थिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस पी. बी. आडे यांचीही आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात भाजपाचे प्रदेश सरचिटणीस पी. बी. आडे यांनी बंडाचे निशाण फडकावत अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार खासदार भावना गवळी यांची डोकेदुखी वाढली आहे. अर्थात लोकसभा निवडणुकीत विजय मिळविण्याचा विश्वास आडे यांना वाटत असावा; त्यामुळे आता या निवडणुकीतील विजयावरच त्यांचे राजकीय अस्तित्व अवलंबून आहे. मतांचे ध्रुवीकरण ठरणार निर्णायकवाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघात मतांचे ध्रुवीकरण निर्णायक भूमिका वठविणार आहे. यवतमाळमध्ये महागाव तालुक्यातील जवळपास ४० मतदान केंद्रांचा समावेश आहे. या सर्व मतदान केंद्रांवर बंजारा मतांचे प्राबल्य आहे. या भागात आडे यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्याचा सर्वाधिक फटका विद्यमान खासदारांनाच बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे माणिकराव ठाकरे यांना धोका आहे. पी. बी. आडे यांचा मतदार संघावर कितपत प्रभाव आहे, यावरही बरेच काही अवलंबून आहे.

टॅग्स :washimवाशिमyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBhavna Gavliभावना गवळीManikrao Thackreyमाणिकराव ठाकरे