शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’चा लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 16:13 IST

बाजारपेठ न मिळाल्याने रिसोड तालुक्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून देशात ‘लॉकडाऊन’ आहे. मार्च ते जून या दरम्यान रसवंत्या बंद राहिल्याने तसेच बाजारपेठ न मिळाल्याने रिसोड तालुक्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. शासनाने आर्थिक मदत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे १८ जुलै रोजी केली.यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मार्च ते मे या महिन्यात लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतरही रसवंती अन्य लघु व्यवसायांना मुभा मिळाली नाही.  रिसोड तालुक्यात जवळपास १६४ एकर क्षेत्रावर लिंबू शेती आहे. दरवर्षी उन्हाळयाच्या दिवसात लिंबूला बऱ्यापैकी मागणी असते. रसवंतीवाले अगोदरपासूनच लिंबूची मागणी नोंदवितात. शरबत व अन्य कारणांसाठीदेखील लिंबूची खरेदी होते. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे ऐन हंगामात रसवंत्या बंद होत्या. त्यामुळे लिंबूची मागणीही आपसूकच घटली. व्यापाºयांकडून लिंबूचा उठावही झाला नाही. काही शेतकºयांनी स्वत: भाजीबाजारात लिंबूची विक्री केली. परंतू, बाजारभाव समाधानकारक मिळाला नाही. लिंबूची मागणी नसल्याने काही ठिकाणी लिंबूची फळे ही झाडालाच सडल्याची माहिती शेतकरी बबनराव मोरे यांनी दिली. झाडाला भरपूर प्रमाणात लिंबू लागले; परंतु मागणी नसल्याने शेतकरी हताश झाल्याचे दिसून येते. 

सहा वर्षांपूर्वी तीन एकर शेतात लिंबूची लागवड केली. दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न होते. यावर्षी कोरोनामुळे लिंबूला मागणी नाही तसेच बाजारपेठही नव्हती. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकºयांना आर्थिक फटका बसला आहे. शासनाने आर्थिक मदत करावी, अशी आमची मागणी आहे.-बबनराव मोरे, लिंबू उत्पादक शेतकरी, निजामपूर

टॅग्स :FarmerशेतकरीwashimवाशिमagricultureशेतीRisodरिसोड