शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांपर्यंतच्या कर्जमुक्ती योजनेच्या ताळेबंदाची लगबग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 15:52 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरिय समितीची बैठक घेण्यात येणार असून, १५ दिवसात आॅडिट पूर्ण केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यशासनाने शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार वाशिम जिल्हयात किती शेतकरी पात्र ठरलीत आणि नेमकी किती कर्जमाफी होईल, याचा हिशोब जुळविण्याची लगबग प्रशासनाकडून सुरु झाली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरिय समितीची बैठक घेण्यात येणार असून, १५ दिवसात आॅडिट पूर्ण केले जाणार आहे.राज्यभरातील शेतकºयांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे तथा दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार, २१ डिसेंबर रोजी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ची घोषणा विधानसभेत केली. या योजनेअंतगर्गत ज्या शेतकºयांकडे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जखात्यात अल्पमुदती पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम २ लाखांपर्यंत आहे. अशा शेतकºयांचे अल्प, अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विारात न घेता त्यांच्या कर्जखात्यात २ लाखापर्यंतची रक्कम जमा करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदती पीक कर्जाचे पुनर्गठन, फेर पुनर्गठन करून मध्यम मुदती कर्जात रुपांतरीत केलेल्या किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेल्या व परतफेड न झालेल्या हप्त्याची रक्कम २ लाखांपर्यंत असल्यास त्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेमध्ये उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे अल्पमुदती पीक कर्ज व अल्पमुदती पीक कर्जाचे केलेले पुनर्गठीत, फेर पुनर्गठीत कर्ज यांची ३० सप्टेंबर २०१९ रोजी वैयक्तीक शेतकºयांच्या सर्व कर्जखात्यांची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रती शेतकरी कमाल २ लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील पात्र शेतकºयांची माहिती गोळा करण्याची लगबग प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तर समितीची बैठक सोमवार, ३० डिसेंबर रोजी आयोजित केली असून, या बैठकीत सर्व मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर १५ जानेवारीपर्यंत शेतकºयांच्या कर्जखात्याचे आॅडिट करून तसा अहवाल विभागीय समितीमार्फत शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

शासन निर्णयानुसार २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकºयांची यादी गोळा करण्याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तर समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, बैठकीनंतर १५ दिवसांत शेतकºयांच्या कर्जखात्याचे आॅडिट केले जाईल.- रमेश कटकेजिल्हा उपनिबंधक तथा सचिवजिल्हास्तर समिती, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी