तीन सापांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:37 AM2021-01-18T04:37:09+5:302021-01-18T04:37:09+5:30

------- शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निकाली वाशिम: जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचे डिसेंबर महिन्याचे वेतन १५ दिवस उलटूनही त्यांना मिळाले नव्हते. ...

Life of three snakes | तीन सापांना जीवदान

तीन सापांना जीवदान

Next

-------

शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निकाली

वाशिम: जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचे डिसेंबर महिन्याचे वेतन १५ दिवस उलटूनही त्यांना मिळाले नव्हते. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे वेतन अदा करण्याची मागणी केली होती. शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निकाली निघाला असून, शिक्षकांच्या वेतनाचे धनादेश बँकेत जमा केल्याचे शुक्रवारी शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

--

नवनिर्मित महामार्गाच्या पुलावर खड्डा

शेलूबाजार: मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार-चिखली दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर लांभाडे यांच्या शेताजवळच्या पुलावर तांत्रिक चुकीमुळे खड्डा तयार झाला आहे. यामुळे येथून वाहने उसळत आहेत. प्रामुख्याने दुचाकी चालकांना याचा त्रास होत असल्याने पुलावरील खोलगट भाग समतल करण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.

--------

शेतीसंबंधी कागदपत्रे ग्रामस्तरावर उपलब्ध करावी !

पोहा : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे विविध योजनांच्या अंमलबजावणीस होणारा परिणाम लक्षात घेता घरकूल योजनेसह शेतीसंबंधी कागदपत्रे ग्रामपंचायतस्तरावर उपलब्ध करावी, अशी मागणी पोहा जि.प. सदस्य आशिष दहातोंडे यांनी शनिवारी केली असून, याबाबत त्यांनी तहसीलदारांसह प्रशासनाला निवेदन दिले आहे.

-----

आरोग्य केंद्राकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन

मेडशी: आरोग्य पोषण व समुपदेशन कार्यक्रमांतर्गत मेडशी परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने शनिवारी ग्रामस्थांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. गेल्या आठवडाभरापासून हा उपक्रम सुरू असून, कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी या उपक्रमाला वेग देण्यात आला आहे.

Web Title: Life of three snakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.