शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

कारंजातील तीन कृषीसेवा केंद्रांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 6:20 PM

वाशिम: यवतमाळ जिल्ह्यातील किटकनाशक फवारणी दुर्घटनेच्या पृष्ठभूमीवर वाशिम जिल्ह्यात खबरदारी म्हणून कृषीसेवा केंद्रांची झाडाझडती सुरूच आहे. या अंतर्गत कृषी विकास अधिकाºयांनी मालेगावातील सहा कृषीसेवा केंद्रांचे परवाने निलंबित केल्यानंतर कारंजा येथेही तालुका कृषी अधिकाºयांनी बेकायदेशी किटकनाशकांची विक्री करणाºया तीन कृषीसेवा केंद्रांवर धडक कारवाई करताना त्यांचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत.यवतमाळ जिल्ह्यात ...

ठळक मुद्देतालुका कृषी अधिकाºयांची कारवाईबेकायदेशीर किटकनाशके विक्रीचा परिणाम

वाशिम: यवतमाळ जिल्ह्यातील किटकनाशक फवारणी दुर्घटनेच्या पृष्ठभूमीवर वाशिम जिल्ह्यात खबरदारी म्हणून कृषीसेवा केंद्रांची झाडाझडती सुरूच आहे. या अंतर्गत कृषी विकास अधिकाºयांनी मालेगावातील सहा कृषीसेवा केंद्रांचे परवाने निलंबित केल्यानंतर कारंजा येथेही तालुका कृषी अधिकाºयांनी बेकायदेशी किटकनाशकांची विक्री करणाºया तीन कृषीसेवा केंद्रांवर धडक कारवाई करताना त्यांचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशकांची फवारणी करताना २३ शेतकºयांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आणि राज्यशासनाने कृषीसेवा केंद्रांची तपासणी करून बेकायदेशीर किटकनाशके विकणाºया कृषीसेवा कें द्रांवर कारवाई करण्याचे फर्मानच सोडले. तत्पूर्वी, वाशिम जिल्हाधिकाºयांनी यवतमाळच्या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा कृषी सेवा केंद्रांची तपासणी करून नियमबाह्य कृषी उत्पादनांची, किटनाशकांची विक्री करणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर कृषी विकास अधिकाºयांनी मालेगाव येथे सवत:च कृषीसेवा केंद्रांची पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाºया पाच दुकानांचे परवाने तात्काळ निलंबित केले होते. आता कारंजा तालुका कृषी अधिकाºयांनीही तालुक्यातील कृषीसेवा केंद्रांची पाहणी केली असता. तीन दुकानांत नियमांचे उल्लंघन करून किटकनाशकांची विक्री सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे तालुका कृषी अधिकाºयांनी तात्काळ या तिन्ही दुकानांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली. सालासर कृषीसेवा केंद्र, भूमी अ‍ॅग्रो, आणि व्यंकटेश कृषी सेवा केंद्र, अशी या तीन दुकानांची नावे असल्याचे तालुका कृषी अधिकारी समाधान धुळधुळे यांनी सांगितले. या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करून किटकनाशकांची विक्री करणाºयांचे धाबे दणाणले आहे. 

टॅग्स :agricultureशेती