शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पीक कर्ज न देण्याची कारणे लेखी स्वरूपात कळवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:30 IST

ज्या बँकांनी शेतकºयांना पीक कर्ज दिले नाही, त्यांच्या शाखा व्यवस्थापकांनी यामागील कारणे लेखी स्वरूपात कळवावी, अशी तंबी जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात सन चालू वर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ९३ हजार ८९० शेतकरी सभासदांना १५३० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्या तुलनेत सद्या केवळ ३१ हजार १३६ शेतकरी सभासदांना २५७ कोटी ३१ लाख रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्याची टक्केवारी जेमतेम १६.८२ आहे. तथापि, ज्या बँकांनी शेतकºयांना पीक कर्ज दिले नाही, त्यांच्या शाखा व्यवस्थापकांनी यामागील कारणे लेखी स्वरूपात कळवावी, अशी तंबी जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात पीक कर्ज वाटपाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक विजय खंडरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील कुठलाच शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची बँकांनी दक्षता घेण्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकºयांना खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा करणे हे बँकांचे महत्वाचे काम आहे; मात्र बँका याकामी सहकार्य करित नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारीत आहेत. ही बाब गंभीर असून संबंधित बँकांनी सामाजिक बांधीलकीतून शेतकºयांपर्यंत पोहचावे व पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. ज्या बँकांच्या शाखांनी पीक कर्ज वाटपात समाधानकारक कामगिरी केली नाही, त्यांच्या शाखा व्यवस्थापकांनी यापुढे दर सोमवारी त्यामागील कारणे लेखी स्वरूपात कळवावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. बँकांच्या ११७ शाखांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट!जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट सोपविण्यात आलेल्या बँकांमध्ये अलाहाबाद बँक, बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, इंडियन ओव्हरसीस बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, सिंडिकेट बँक, युको बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, अ‍ॅक्सीस, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय बँक, वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक, महाराष्ट्र आणि मध्यवर्ती सहकारी बँकांच्या एकूण ११७ शाखांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbankबँक