शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कामगार अधिवेशनात उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांची लागणार रजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 14:31 IST

एसटी कर्मचाºयांना त्या दिवसाची रजा मंजूर करण्याच्या सुचना एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने ६ मार्च रोजी सर्व विभागस्तरावर दिल्या आहेत.

वाशिम: कोल्हापूर येथे १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कामगार संघटनेच्या अधिवेशनास उपस्थित राहिल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची कामावर अनुपस्थिती राहिली. यामुळे वेतन कपात होऊ नये म्हणून त्या कर्मचाºयांना रजा मंजूर करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीची दखल घेऊन संबंधित एसटी कर्मचाºयांना त्या दिवसाची रजा मंजूर करण्याच्या सुचना एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने ६ मार्च रोजी सर्व विभागस्तरावर दिल्या आहेत.महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने कोल्हापूर येथे १३ आणि १४ फेबु्रवारी २०२० रोजी संघटनेचे वार्षिक अधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनात एसटीच्या राज्यभरातील ३१ विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. अधिवेशनास उपस्थित राहिल्याने संबंधित कर्मचारी कर्तव्यावर हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या अधिवेशन काळातील उपस्थितीच्या दिवशीचे वेतन कपात होण्याची शक्यता होती. या पृष्ठभुमीवर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने अधिवेशनात उपस्थित असलेल्या कर्मचाºयांची त्या दिवसाची रजा मंजूर करण्याची मागणी एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडे १७ फेबु्रवारी रोजी सादर केलेल्या पत्राद्वारे करण्यात आली होती. त्या मागणीची दखल घेण्यात आली असून, अधिवेशन काळातील एसटी कर्मचाºयांच्या उपस्थितीच्या दिवसाची रजा संबंधित कर्मचाºयांच्या खात्यावर शिल्लक असलेल्या रजांमधून मंजूर करण्याच्या सुचना मध्यवर्ती कार्यालयाने सर्व विभाग नियंत्रकांना ६ मार्च रोजी पत्र पाठवून दिल्या आहेत.

 

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी